अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉसमुळे या जोडीचा चाहता वर्ग वाढला आणि दोघेही घराघरांत लोकप्रिय झाले. २२ जुलैला दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत लग्नाच्या तारखेची घोषणा केली. प्रसाद-अमृताचं लग्न नोव्हेंबर महिन्यात असल्याने नुकतीच त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचं पहिलं केळवण तिच्या आजोबांनी थाटात साजरं केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रसाद आणि तिच्या पहिल्या केळवणाचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अमृताच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळत असून दोघांनीही एकमेकांसाठी खास उखाणा घेतला आहे.

हेही वाचा : “शासनाने तुमची दखल घेतली नाही”, शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्त केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट; म्हणाले…

अमृता-प्रसादचं पहिलं केळवण अभिनेत्रीच्या ८७ वर्षाच्या आजोबांनी थाटात साजरं केलं. अमृता तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या ८७ व्या वर्षी सगळं प्लॅनिंग करून, भेटवस्तू, बुके या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली..एवढं सगळं झाल्यावर मग “उखाणा घ्या” ह्या ऑर्डर ला नाकारणार कसं?” आजोबांच्या सांगण्याप्रमाणे दोघांनीही खास उखाणे घेतले.

हेही वाचा : “१४८ तास शूटिंग, पुरुषांच्या बाथरूममध्ये अंघोळ अन्…”, अंकिता लोखंडेचा ‘पवित्र रिश्ता’बद्दल मोठा खुलासा

अमृता म्हणाली, “नाटकाच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलं केळवण”, तर प्रसाद जवादेने सुद्धा होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा घेत सासू-सासूऱ्यांना इम्प्रेस केलं. तो म्हणाला, “कितीही वणवण फिरलीस तरी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी.” सध्या दोघांवरही नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”

‘बिग बॉस’च्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, दोघेही १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच अभिनेता प्रसाद जवादे सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत ‘प्रितम’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta deshmukh and prasad jawade first kelvan and ukhana video viral on social media sva 00