Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ सप्टेंबरला थाटामाटात पार पडला. जवळच्या नातेवाईकांसह अनेक मराठी कलाकारांनी अमृता-प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती. जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून चाहते अमृता-प्रसादच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दोघांचा लग्नातील पारंपरिक लूक, लग्नविधी, हळदी समारंभ, प्रसादच्या गळ्यातील अमृता नावाचं लॉकेट याबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सासरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

हेही वाचा : फुलंब्रीकर कुटुंबाच्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! २० लाखांमुळे येणार अनोखा ट्विस्ट, ‘एकदा येऊन तर बघा’चा ट्रेलर प्रदर्शित

जवादेंच्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर अमृता आणि प्रसादने जोडीने सत्यनारायण पूजा केली. दोघांचा सत्यनारायण पूजेचा फोटो अमृताची आई आणि प्रसादच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं…”, सिडनी दौऱ्यावर जाणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार, म्हणाले…

prasad jawade amruta deshmukh
प्रसाद जवादे-अमृता देशमुख

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि प्रसाद जवादे शेवटचा ‘काव्यांजली’ मालिकेत झळकला होता.

Story img Loader