अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘बिग बॉस’मुळे या जोडीचा चाहता वर्ग वाढला आणि दोघेही घराघरांत लोकप्रिय झाले. २२ जुलैला दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत लग्नाच्या तारखेची घोषणा केली. प्रसाद-अमृताचं लग्न नोव्हेंबर महिन्यात असल्याने आता त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचं पहिलं केळवण तिच्या आजोबांनी थाटात साजरं केलं होतं. आता प्रसाद-अमृताचं दुसरं केळवण ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने थाटात साजरं केलं आहे.

हेही वाचा : “सिग्नलवर एका तृतीयपंथीयाने…”, विशाखा सुभेदारने सांगितला भावनिक किस्सा; म्हणाली, “एक माणूस म्हणून…”

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने प्रसाद अमृताचं केळवण रेस्टॉरंटमध्ये साजरं केलं. या केळवणाचा खास व्हिडीओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या जोडप्याला भविष्यासाठी शुभेच्छा द्यायला यावेळी संजय जाधव, हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, अनघा अतुल, आशुतोष गोखले हे कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आहे ‘या’ हिंदी मालिकेचा रिमेक, अपूर्वा नेमळेकरने सांगितलं सत्य

प्रसाद-अमृतासाठी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने रेड वेलव्हेट केक आणला होता. अमृताने या व्हिडीओला “उखाणा क्रमांक २! खूपच सुंदर केळवण…धन्यवाद” असं कॅप्शन दिलं आहे. केळवणाच्या कार्यक्रमादरम्यान अमृताने घेतलेल्या सुंदर उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधलं. ती म्हणाली, “गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा…प्रसादचं नाव घेते विथ टीम रंग माझा वेगळा.”

हेही वाचा : “…आणि आम्ही दीपिकाला मुर्खात काढलं”; शाहरुख खानने सांगितला ‘जवान’च्या शुटींगदरम्यानचा किस्सा

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत. दोघेही येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

Story img Loader