अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख नुकतेच लग्नबंधनात आडकले. दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जवळचे नातेवाईक आणि मराठी कलाकारांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. दरम्यान लग्नानंतर अमृता आणि प्रसादने एकमेकांसाठी फिल्मी उखाणा घेतला. या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली होती.
प्रसाद आणि अमृताच्या लूक चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी दोघांनी पांरपारिक लूक परिधान केला होता. अमृताने गुलाबी रंगाची साडी, तर प्रसादने पिवळ्या रंगाचं पितांबर नेसल. दोघांच्या या लूकने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं. दोघांच्या या साधेपणाचं अनेकांनी कौतुक केलं. यावेळी प्रसाद आणि अमृताने एकमेकांसाठी मजेशीर उखाणा घेतला. अमृता म्हणाली, “आठवत नाहीये उखाणा मला करावं लागणार आहे बहुतेक गुगल. प्रसादचं नाव घेते आठवतोय का तुम्हाला हिरो हंसराजच जुगलं”. यानंतर प्रसादनेही अमृतासाठी खास उखाणा घेतला प्रसाद म्हणाला “लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन, अमृताचं नाव घेतो आता लाईफमध्ये नो टेन्शन.”
‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात प्रसाद आणि अमृता सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे जाऊन या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. जुलै महिन्यात प्रसाद आणि अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला होता. प्रसाद अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अमृताचे ‘नियम व अटी लागू’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तर प्रसाद जवादे शेवटचा काव्यांजली मालिकेत झळकला होता.