अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची जोडी ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. ‘बिग बॉस’च्या घरात दोघांमध्ये घट्ट मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. २२ जुलैला दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत लग्नाच्या तारखेची घोषणा केली. ‘बिग बॉस’च्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत. याच दरम्यान, प्रसाद-अमृताच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : Video : भर कार्यक्रमात आलिया भट्ट विसरली संवाद, रणवीर सिंह चेष्टा करत म्हणाला, “आता माझ्याकडे…”

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

‘बिग बॉस’चे चौथे पर्व गाजवणाऱ्या या जोडीने आजवर कोणत्याच प्रोजेक्टमध्ये ऑनस्क्रीन एकत्र काम केले नव्हते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचेही चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण झाली असून, प्रसाद-अमृताने एका नामांकित सराफाच्या दागिन्यांच्या जाहिरातीसाठी एकत्र काम केले आहे. यासंदर्भात अमृताने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत, ‘बिग बॉस’नंतर प्रसाद – अमृता पहिल्यांदाच एकत्र असे यामध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : “नग्नता, आक्षेपार्ह सीन्सचा भडीमार…”, ओटीटी माध्यमांवर अन्नू कपूर यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “पैसा कुठून…”

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वानंतर अमृता आणि प्रसादने पहिल्यांदाच या जाहिरातीच्या माध्यमातून एकत्र काम केले. यामध्ये दोघांनी ‘नवरा बायको’ची भूमिका साकारली आहे. सध्या या व्हिडीओवर दोघांचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “आधी लगीन कोंढाण्याचं…”, इतिहासाच्या पुस्तकातील आठवणी होणार ताज्या; ‘सुभेदार’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

दरम्यान, २२ जुलैला खऱ्या आयुष्यात साखरपुडा केल्यानंतर दोघेही १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर, अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिने ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. तसेच अभिनेता प्रसाद जवादे सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत ‘प्रितम’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Story img Loader