Amruta Deshmukh And Krutika Deo : ‘फ्रेशर्स’ या मालिकेमुळे अभिनेत्री अमृता देशमुख घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय तिने रंगभूमीवर देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमुळे पुण्याची ही टॉकरवडी घराघरांत लोकप्रिय झाली. अमृताचा सख्खा भाऊ आणि त्याची पत्नी म्हणजेच अमृताची वहिनी देखील कलाविश्वात सक्रिय आहे. तिचा भाऊ अभिषेक देशमुख गाजलेल्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशच्या भूमिकेत झळकला होता. तर, अमृताने नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमध्ये एन्ट्री घेत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

अमृता देशमुख ( Amruta Deshmukh ) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. याशिवाय ती विविध मनोरंजक विषयांवर युट्यूब व्हिडीओ देखील शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. यामध्ये अमृता आणि तिची वहिनी एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या वहिनीचं नाव कृतिका देव असं आहे. ती सुद्धा मनोरंजनविश्वात सक्रिय आहे.

हेही वाचा : Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपल्यानंतर मंदार जाधवला सेटवरील ‘या’ जागेची येईल खूप आठवण, म्हणाला, “गेली पाच वर्षे…”

कृतिकाने यापूर्वी गाजलेल्या ‘ताली’, ‘झूम’ अशा सीरिजमध्ये काम केलंय. तसेच बॉलीवूडच्या ‘पानिपत’ चित्रपटात सुद्धा कृतिकाने हिंदी कलाविश्वातील बड्या स्टार्सबरोबर स्क्रिन शेअर केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या नणंद-भावजयचा डान्स व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अमृता ( Amruta Deshmukh ) आणि कृतिका या दोघींनी इन्स्टाग्रामवर सर्वत्र ट्रेंड होणाऱ्या APT या ROSE आणि ब्रुनो मार्सच्या गाण्यावर जबरदस्त जुगलबंदी करत डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये क्रॉप टॉप घालून या दोघी व्हायरल गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : स्वप्नील जोशीने दिली आनंदाची बातमी! पहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीसह करणार काम

अमृताने ( Amruta Deshmukh ) शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूपच सुंदर”, “लय भारी” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या दोघींच्या एनर्जीचं भरभरून कौतुक केलं आहे. अमृता आणि कृतिका एकमेकींच्या नणंद भावजय जरी असल्या तरी या दोघींमध्ये अगदी जवळच्या मैत्रिणींसारखं बॉण्डिंग आहे. यापूर्वी देखील यांचे बरेच एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नेटकरी या दोघींच्या सुंदर नात्याचं तसेच अभिनय क्षेत्रातील कामगिरीचं नेहमीचं कौतुक करत असतात.

Story img Loader