अभिनेत्री अमृता देशमुख(Amruta Deshmukh) ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे चर्चेत आहे. आता अमृता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील शेअर केलेले फोटो सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता देशमुखची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री

अभिनेत्री अमृता देशमुखने सोशल मीडियावर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसणाऱ्या कलाकारांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर आणि अभिनेता ओंकार राऊत यांच्याबरोबरचा हा फोटो आहे. यावर अभिनेत्रीने रियुनियन असे लिहिले आहे. याचबरोबर, अमृताने तिच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे, ज्यात ती फोटोंसाठी पोज देताना दिसत आहे. त्यानुसार ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री घेणार असं म्हटलं जात आहे. अमृता देशमुख आता या सर्व कलाकारांबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर व ओंकार राऊत या तिघांविषयी बोलायचे तर हे तिघे याआधी झी युवा वाहिनीवरील फ्रेशर्स या मालिकेत दिसले होते. २०१६ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अमृताने परी देशमुख हे पात्र साकारले होते. रसिकाने रेणुका भिल्लारे तर ओंकार राऊतने धवल हे पात्र साकारले होते. याशिवाय या मालिकेत रश्मी अनपट, सिद्धार्थ खिरीड, मिताली मयेकर, शुंभकर तावडे हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. कॉलेजमधील तरूणाईवर आधारित ही मालिका होती. त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते. आता २०१६ नंतर हे तीन कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

इन्स्टाग्राम

सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. कलाकरांचा सहज अभिनय व अफलातून विनोद यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते. कलाकारांबरोबरच या शोचे सूत्रसंचालन करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कमेंटसने लक्ष वेधून घेताना दिसते. तर अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी असल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा: Bigg Boss 18: “तुला लाज वाटली पाहिजे”, रजत दलालची शिल्पा शिरोडकरवर टीका; म्हणाला, “तुझ्यात ताकद असेल तर…”

दरम्यान, अभिनेत्री अमृता देशमुख ही बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानंतर ती मोठ्या चर्चेत आली होती. याच पर्वात सहभागी झालेला अभिनेता प्रसाद जवादेबरोबरच्या मैत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या शोनंतर अमृता व प्रसादने लग्न केले. अभिनेत्री अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात अमृताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमृता या शोमध्ये पाहुणी म्हणून झळकणार की आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना हसवताना दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta deshmukh entry maharashtrachi hasyajatra popular tv show shares photo with onkar raut and rasika vengurlekar says reunion nsp