‘बिग बॉस मराठी ४’ मधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुखचा विवाहसोहळा आज १८ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. नुकताच त्यांचा हळदी आणि संगीत समारंभ पार पडला. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा- Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’चा उद्या प्रसारित होणार शेवटचा भाग; मालिकेतील प्रवास सांगताना कलाकारांचे डोळे पाणावले

article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Actor Sankarshan Karhade presented a beautiful poem for his mother watch video
Video: “जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा”, संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून कलाकार झाले भावुक, पाहा व्हिडीओ
Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ
Success Story of Nirmal Kumar Minda who started business from small shop now owner of crore business gurugram richest man
एका लहानशा गॅरेजपासून केली सुरूवात अन् आता झाले कोटींचे मालक, जाणून घ्या गुरुग्रामच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास
dr akshaykumar kale
लोकजागर: वादाची ‘कविता’!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी घेतला. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठीत लेखन आता अभिमानास्पद’
inspirational story of Renowned poet and former IPS officer Keki N Daruwalla
व्यक्तिवेध : केकी दारूवाला

अमृता आणि प्रसादच्या संगीत समारंभात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. नुसतीच हजेरी नाही, अनेकांनी त्यांच्या संगीत कार्यक्रमात भन्नाट डान्सही केला. या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अमृताच्या वडिलांनी. प्रसाद आणि अमृताच्या संगीत कार्यक्रमात अमृताच्या वडिलांनी मुलीसाठी एक खास कविता सादर केली. ही कविता ऐकून सगळेच भावुक झाले होते.

अमृताच्या वडिलांची कविता

गुंतले होते जीव असे की डोळ्यात दिसत होतं यांना सर्वकाही,
प्रीतीचा बहर फुलला असा काही त्या गंधाची चढली होती नशाही,
आपण दोघं केवळ दोघं दुसरं कुणीही नाही,

हे भल्या माणसा एक जरा मी सांगतो गुपित तुला,
मी तिला आणि तिने मला रे पहिला वहिला श्वास दिला,
सांगेल तुला ती अर्थ जगाचाआधी तिने माझ्यातच पाहिला,

मी कसा विसरू सांग? मी कसा विसरू सांग
त्या तिच्या शांत श्वासांना, झोपेतल्या मिश्किल हसण्याला,
दुधाचा वास जेव्हा आला तिच्या नाजूक साजूक ओठांना

मी कसा विसरू सांग? मी कसा विसरू सांग
कुशीतल्या त्या क्षणांना, तिच्या माझ्या मिठीला,

हृदयातून गलबलताना घेतलेल्या चिमुकल्या मुक्याला,
आणि इवल्या इवल्या बोटांनी बोट माझं धरायला,

बोबड्या बोबड्या बोलांनी बाबा म्हणून हसण्याला,
आठवतंय अजूनही, ओढलेली मिशी, तुटलेला चष्मा आणि फेकलेलं पेन
ओळखीची चाहूल मारलेली, मारलेली मुसळी आणि तुटलेली चैन,

कळतंय रे बापाच्या अंत नसतो भावनेला,
पण प्रश्न मनात आला तुझ्यासोबत पाहून या राणीला,
हेच का ते उनाड बछडं, रात्री गोष्टीसाठी हटणारं,
डोळ्यात जीव आणून परिकथेत रमणारं,

उठली कळ आणि एक उसासा, महिमा काळाचा हा असा,
असो आता सांभाळ या मुलीला, माझ्या लाडक्या जीवाला

अरे असेल जर ही जगरहाटी तर काळही बदलेल कधी कुशीला
नसेनही मी सोबतीला, नसेल अडसर तुला
पण स्मरशील मला तिच्या पहिल्या प्रेमाला,
मी तिच्यावर पहिलं प्रेम केलं होतं,
मी तिच्यावर पहिलं प्रेम केलं होतं.

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वापासून अमृता आणि प्रसादच्या मैत्रीला सुरुवात झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत.