अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाहसोहळा १८ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. शाही विवाहसोहळ्यानंतर आता प्रसाद-अमृताने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

‘पुण्याची टॉकरवडी’ म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लग्नानंतर अभिनेत्री काही दिवस आजारी होती. तरीही तिने नाटकाचे सलग प्रयोग केले. याबाबत अमृताची आई वैशाली देशमुख यांनी पोस्ट शेअर करून लाडक्या लेकीचं कौतुक केलं आहे.

Son Death 10 Days After Mother Death in Beed
Mother and Son Death : आई वारल्यानंतर होता दशक्रिया विधी, त्याच दिवशी मुलाची अंतयात्रा! बीडमधली हृदयद्रावक घटना
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
conversion
Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

अमृता देशमुखच्या आईची पोस्ट

The show must go on… !
प्रत्येक कलाकारासाठी हे ब्रीदवाक्य असतं…पण, प्रत्यक्षात हे किती कठीण असतं हे ज्याच्यावर ती वेळ येते त्यालाच ठाऊक…
अंगात 100 ताप…दोन वाक्य बोललं की येणारा खोकला… तापामुळे आलेला अशक्तपणा… पुरेशी न झालेली झोप.. आणि त्यात प्रवास या अशा परिस्थितीत अमृताने नियम व अटी लागू या नाटकाचे तीन दिवसांत सलग चार प्रयोग केले.

त्यातला पहिला प्रयोग बोरिवली आणि नंतरचे पुण्यात…प्रसाद, आम्ही सगळे आणि डॉक्टर तिच्या पाठीशी होतोच पण ज्या जिद्दीने तिने हे प्रयोग केले त्याला तोड नाही…कदाचित प्रेक्षकांच्या लक्षात सुध्दा आले असणार तिचे आजारपण…पण त्यांचा मिळणारा जिवंत प्रतिसाद हीच तिची खरी willpower …!
अमृता तुझा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो!
रंगभूमी पुन्हा एकदा गाजवण्यासाठी लवकरात लवकर बरी हो!

दरम्यान, अमृता देशमुख-प्रसाद जवादे या दोघांची जोडी ‘बिग बॉस’मराठीच्या चौथ्या पर्वामुळे चर्चेत आली होती. या कार्यक्रमात दोघंही एकत्र सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांची मैत्री झाली पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी जुलैमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला. दोघांच्या नुकत्याच पार पडलेल्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.