Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा जवळचे नातेवाईक आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला आहे. ‘बिग बॉस’मुळे यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून चाहते अमृता-प्रसादच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

प्रसाद-अमृताने अद्याप लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत पण, त्यांचा सप्तपदी घेतानाचा एक सुंदर फोटो प्रार्थना बेहेरेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे प्रसाद-अमृताच्या लग्नातील त्यांचा खास लूक सर्वांसमोर आला आहे.

हेही वाचा : Video : ‘झिम्मा २’च्या कलाकारांनी सेटवर ‘अशी’ केली धमाल, ‘मराठी पोरी’ गाण्याचा पडद्यामागचा व्हिडीओ पाहिलात का?

प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता-प्रसादचा पारंपरिक लूक पाहायला मिळायला मिळत आहे. अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी, तर प्रसादने पिवळ्या रंगाचं पितांबर नेसल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांच्याही पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : कुणी चाळीतील क्रिकेटच्या आठवणी जागवल्या, तर कुणी सचिन तेंडुलकरच्या; मराठी कलाकार भारतीय संघाला शुभेच्छा देत म्हणाले…

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Marathi News
प्रसाद जवादे-अमृता देशमुख

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि प्रसाद जवादे शेवटचा काव्यांजली मालिकेत झळकला होता.