बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख अखेर लग्नबंधनात अडकली. अमृताने अभिनेता प्रसाद जवादेबरोबर लग्नगाठ बांधली. अमृता-प्रसादच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता प्रसादची कानपिळी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजश्री मराठीने प्रसाद आणि अमृताच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओत अमृता देशमुखचा भाऊ अभिषेक हा प्रसादची कानपिळी करताना दिसत आहे. या व्हिडीओत तो प्रसादचे कान पिळताना दिसत आहे. त्यावेळी अभिषेक हा “बहिणीची काळजी घे रे”, असे त्याला बजावून सांगताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video : मराठमोळा लूक, फुलांची उधळण अन्…; अमृता देशमुख-प्रसाद जवादेचा शाही विवाहसोहळा पडला पार, पाहा लग्नाचा खास व्हिडीओ

यावर प्रसादही हटके पद्धतीने उत्तर देतो. “तू जितकी घेतलीस, त्याच्या कित्येक पटीने जास्त मी तिची काळजी घेईन”, असे आश्वासन प्रसादने अमृताचा भाऊ आणि कुटुबियांना यावेळी दिले. प्रसादचे हे उत्तर ऐकून अभिषेकने पुन्हा एकदा त्याचे पिळले.

दरम्यान अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने जुलै महिन्यात रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर शनिवारी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली. प्रसाद-अमृताने लग्नात सप्तपदी घेताना खास मराठमोळा लूक केला होता. अमृताने गुलाबी रंगाची भरजरी साडी, नाकात नथ, गळ्यात दागिने, कपाळी चंद्रकोर असा खास लूक करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रसादनेही बायकोला साजेसं असं पिवळ्या रंगाचं पितांबर लग्न लागताना नेसलं होतं.

आणखी वाचा : अमृता देशमुख-प्रसाद जवादे लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो आला समोर, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झाली. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यामुळे ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून प्रेक्षकांकडून सध्या आनंद व्यक्त करण्यात येत आहे. प्रसाद-अमृताने त्यांच्या लग्नातील खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “आमच्या आयुष्यातील जादुई दिवस १८/११/२०२३” असं खास कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta deshmukh prasad jawade wedding abhishek deshmukh kanpili ritual video viral social media nrp