‘बिग बॉस मराठी ४’फेम अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) सातत्याने चर्चेत असते. कधी तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे, तर कधी सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे ही अभिनेत्री सातत्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अनेकदा ती प्रसाद जवादेबरोबरच्या फोटो, व्हिडीओ यांमुळेदेखील ती चर्चेत असते. आता अभिनेत्रीने तिच्या भावाच्या पत्नीबरोबर म्हणजेच अभिनेत्री कृतिका देवबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अमृता देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता व कृतिका विविध पोशाखांमध्ये दिसत आहेत. साडी व ड्रेसमध्ये या दोन्ही अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी त्या थकून बसलेल्या दिसतात. हा व्हिडीओ शेअर करताना अमृताने, “आमचा डिसेंबर थकवणारा होता. लग्न, साडी, डान्स व रील्स!”, अशा आशयाची कॅप्शन दिली आहे.
प्रसाद जवादेकडून कौतुक
अमृताच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सगळ्यात अमृताचा पती प्रसाद जवादेनेदेखील तिच्या या व्हिडीओवर कमेंट करीत लक्ष वेधून घेतले. प्रसाद जवादेने ‘भारी’ असे लिहीत दोघींचे कौतुक केले आहे.
अभिनेत्याबरोबरच अनेक चाहत्यांनीदेखील तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “अमृताताई, तू नेहमी क्यूट दिसतेस”, दुसऱ्या एका चाहत्याने, “किती छान आणि सुंदर. खूप म्हणजे खूप मस्त”, असे लिहीत कौतुक केले. आणखी एका नेटकऱ्याने “आवडती जोडी”, अशी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने अमृता व कृतिकाला टॅग करीत लिहिले, “कमाल, गोड मुलींनो. तुम्हा दोघींना खूप प्रेम”, तर अनेकांनी मस्त, भारी, असे म्हणत या दोघींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : हातात हिरवा चुडा, मेहंदी अन्…; ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, “लवकरच…”
अमृता देशमुख ही अभिनयाबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील रील्स, फोटो, व्हिडीओ यांमुळेदेखील मोठ्या चर्चेत असते. प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही जोडी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. तर, कृतिका देवने ‘हवाईजादा’, ‘पानिपत’, ‘बकेट लिस्ट’, ‘हॅपी जर्नी’, ‘डिलिव्हरी गर्ल’, ‘ताली’, ‘प्राइम टाइम’, ‘राजवाडे सन्स’ अशा मराठीसह हिंदी चित्रपटांतून काम केले आहे. तर अभिनेता प्रसाद जवादे ‘पारू’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे.