अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ नोव्हेंबर रोजी थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकर व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर आता नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे.

अमृताच्या लग्नपत्रिकेवर तिने लिहिलेली स्वरचित कविता छापण्यात आली होती. याबद्दल अमृताने नुकतीच पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिच्या स्वरचित कवितेला लग्नाच्या पत्रिकेवर हस्तलिखित रूप दिल्याबद्दल अमृताने या पोस्टमधून जवळच्या मित्राचे आभार मानले आहेत.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
How Was Supriya sule Marriage Fix
Supriya Sule Marriage : “मग मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलतोय”, लग्न जुळवताना सदानंद सुळेंची झाली होती फजिती; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

हेही वाचा : “जे खूप घातक आहे”, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासंदर्भात वैभव मांगलेंची पोस्ट; म्हणाले, “हिंसा आणि लैंगिकता…”

अमृताच्या लग्नपत्रिकेमधील कवितेने वेधलं लक्ष

समांतर असा सुरू होता
त्या दोघांचा प्रवास…
अनपेक्षित क्षणी आला
सक्तीचा सहवास
भिन्न स्वभाव
भिन्न विचार
प्रेमावर मात्र दृढ विश्वास.
आधी त्याने घेतला हातात हात
मग तिने सोडली नाही
कधीच त्याची साथ…
दोन मनानंच सुरू झाला होता
Experimental संवाद…
मात्र Permanent सुखी
जीवनासाठी हवेत आता…
फक्त तुमचे आशीर्वाद

दरम्यान, प्रसाद-अमृताच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांनी बिग बॉसमराठी कार्यक्रमात एकत्र सहभाग घेतला होता. पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि १८ नोव्हेंबर २०२३ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.