‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची रनर अप ठरली. कोल्हापूरची मिरची असलेल्या अमृता धोंगडेने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं होतं. परंतु, तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसच्या घरात असताना अमृता धोंगडे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात सतत खटके उडताना दिसले. त्यानंतर आता अमृताने एका मुलाखतीदरम्यान अपूर्वाचा स्वभाव आणि तिला भेटण्याबद्दल भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमृता धोंगडे हिने नुकतंच ‘एबीपी माझा’ या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिला तुला अपूर्वाला भेटायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने स्पष्ट भाषेत उत्तर दिले. यावेळी ती म्हणाली, “मी आणि अपूर्वा झी मराठीच्या विविध मालिकांमध्ये काम करायचो. त्यामुळे मी तिला ओळखत होते. आम्ही दोघांनी एकत्र रुमही शेअर केली होती. त्यामुळे जेव्हा ती घरात आली तेव्हा त्यातल्या त्यात माहिती असणारी व्यक्ती आहे, असं मला तेव्हा वाटलं होतं. पण दोघींचे स्वभाव बघता वादाला सुरुवात झाली आणि तो वाद शेवटपर्यंत राहिला.”
आणखी वाचा : “भातुकलीच्या खेळामधली राजा-राणी…”, लग्नावरचा विश्वास उडालाय का? विचारणाऱ्याला मानसी नाईकचं स्पष्ट उत्तर

“बिग बॉसच्या घरात सतत कोणतरी टार्गेट होत असतं. यात माझ्याकडून आणि अपूर्वाकडून एकमेकांना वारंवार टार्गेट केलं गेलं. आमच्या दोघींचे स्वभाव वेगवेगळे आहेत. आमचं घरात अजिबात पटलं नाही. एकमेकींशी कायमच पटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत ते जुळलंच नाही. अपूर्वा ही माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. ती माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे, असे मला वाटतं होतं. पण ते तसं नाही. ती खंत मला आहे”, असेही अमृताने म्हटले.

“मला तिच्याविषयी मनात काहीही ठेवायचे नाही”

“मी अपूर्वाला आता नक्कीच भेटेन. घरात जे काही झालं असलं तरी मी तिला बाहेर भेटेन. तिला हेझलनट्स कॉफी फार आवडते. तर मलाही तिच्याबरोबर ती कॉफी प्यायला आवडेल. बिग बॉसच्या घरात ज्या काही गोष्टी झाल्या त्या झाल्या, पण आता बाहेर आल्यावर मला त्या गोष्टींवरुन अडून राहायचं नाही. मराठी सिनेसृष्टी फार लहान आहे. त्यामुळे आपल्याला भेटण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तीलाही भेटावं लागतं. त्याच्याबरोबर काम करावं लागतं. त्यामुळे मी माझ्या मनात कोणतीही अडी ठेवली तर मलाच ते पटणार नाही. मला तिच्याविषयी मनात काहीही ठेवायचे नाही. बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर आता ते कुठेतरी थांबायला हवं. कामानिमित्त असो किंवा जेव्हा मला कधी वेळ मिळेल तेव्हा मी तिला नक्की भेटेन”, असेही ती म्हणाली.

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

दरम्यान अमृता धोंगडेने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. झी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.