छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ची सध्या चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होऊन आता आठवडा होऊन गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजशिर्के, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, रुचिरा जाधव असे प्रसिद्ध चेहेरे या नव्या पर्वात झळकले आहेत. बिग बॉसच्या घरातून हे कलाकार पुढील १०० दिवस प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. पण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्पर्धकांना आता त्यांच्या कुटुंबियांची आठवण येऊ लागली आहे.
आणखी वाचा : ‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
अमृता धोंगडे, प्रसाद जवादे आणि किरण माने बोलत असताना अमृता धोंगडेला घरच्यांच्या आठवणीत अश्रू अनावर झाले आणि तिला रडू कोसळले. म्हणूनच किरण माने तिची समजूत काढताना दिसले, तर प्रसाद जवादे तिला हसवण्याचा प्रयत्न करताना दिसला. प्रसादने अमृताला विचारले, “आम्ही काय घरातले नाही का? का रडतेस?” पण अमृताचे म्हणणे आहे इथे सगळेच खेळायला आले आहेत. त्यावर किरण माने म्हणाले, “मी काय काय सोसलं असेल काल…”
पुढे प्रसाद म्हणाला, “टास्क हा पण आहे ना की, तुला खरंच ओळखायचे आहे कोण आपले आहेत ? कोण? ते चुकलं ना की घरातल्यांची आठवण जास्त येते. पहिल्या दिवशी माझ्या डोक्यात फक्त तेच सुरु होतं.” तर त्यावर किरण माने म्हणाले, “ते चुकलं ना की गणित चुकतं. काही लोकं आपल्याजवळ येतात, ते आपला प्रभाव कमी करायला येतात आणि काही लोकं आपला प्रभाव वाढवायला येतात.”
हेही वाचा : Video: “मूठभर मास अंगावर चढलं…”, उत्कर्ष शिंदेला आलेल्या अनुभवाने वेधले लक्ष, पोस्ट व्हायरल
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची थीम ‘ऑल इज वेल’ अशी आहे. यापूर्वी एक प्रोमोमध्ये होस्ट महेश मांजरेकर यांनी या पर्वात भांडणं, गोंधळ नसणार असं म्हटलं होतं. पण बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडायला फारसा वेळ लागत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या दिवसापासूनच बिग बॉसमधील स्पर्धकांमध्ये खटके उडाल्याचं चित्र दिसून आलं आणि आता ग्रुप्सही निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे आगामी दिवसात काय पाहायला मिळतंय हे औत्सुक्याचं ठरेल.