मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’मुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृता सर्वाधिक चर्चेत राहणारी स्पर्धक ठरली. तिचे घरातील सदस्यांशी वाद झाले. पण तिची आणि अभिनेत्री तेजस्वी लोणारीची मैत्री बरीच चर्चेत होती पण एका टास्कदरम्यान दोघीचं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. पण नंतर त्या दोघी पुन्हा एकत्र दिसल्या. आता अमृचाने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

बिग बॉसच्या घरात अमृता धोंगडे आणि तेजस्वी लोणारी यांची मैत्री खूप चर्चेत राहिली होती. पण एका टास्कदरम्यान या दोघींमध्ये वाद झाले. त्यानंतर दोघी एकमेकींशी बोलल्या नव्हत्या. अर्थात बिग बॉस मराठीच्या फिनालेआधी तेजस्वी बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अमृता तिला भेटली होती मात्र त्यांची मैत्री कशी आहे याचा खुलासा झाला नव्हता. तसेच बिग बॉस संपल्यानंतर या दोघी एकमेकींना भेटल्या नव्हत्या किंवा कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्यामुळे या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. पण आता या चर्चांना अमृताने पूर्णविराम लावला आहे.

Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Bigg Boss 18 chahat pandey talks about boyfriend with kashish Kapoor watch video
Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
Bigg Boss 18 Chahat Pandey mother challenge to bigg boss makers to find out daughter boyfriend
Bigg Boss 18: चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना दिलं खुलं आव्हान, २१ लाखांचं बक्षीस केलं जाहीर; का, कशासाठी? जाणून घ्या…
Bigg Boss 18 Varsha Usgaonkar praises Shilpa Shirodkar and karanveer Mehra
Bigg Boss 18: “मला ती खूप आवडते…”, वर्षा उसगांवकरांनी शिल्पा शिरोडकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीच्या मते ‘हा’ सदस्य ट्रॉफीच्या जवळ
Bigg Boss 18 Kashish Kapoor is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फॅमिली वीकमध्ये झालं एविक्शन, चुम दरांगच्या आईची खरी ठरली भविष्यवाणी, ‘हा’ सदस्य झाला घराबाहेर
Vivian Dsena ex wife Vahbbiz Dorabjee left Deewaniyat Serial
Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?
Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल

आणखी वाचा- “तुला जन्मजात अभिनेत्री म्हणून…”, अनुपम खेर यांची आलिया भट्टसाठी खास पोस्ट

अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तेजस्वी लोणारीबरोबर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अमृताने सांगितलं आहे की बिग बॉसच्या घरातील भांडणाचा त्यांच्या मैत्रीवर काहीच परिणाम झालेला नाही आणि त्या दोघी एकमेकींना नेहमीच भेटतात. फक्त सोशल मीडियावर एकत्र येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. लवकरच त्या दोघीही एका प्रोजेक्टमध्येही एकत्र दिसणार आहेत.

आणखी वाचा- “मला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे पण…” ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनने दिली प्रतिक्रिया

अमृताने हा व्हिडीओ शेअर करताना “अखेर तेजस्वी आणि अमृताचा मिलाप झाला आहे लवकरच येतोय भेटायला” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकींची मस्करी करताना आणि धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. लवकरच या दोघी स्क्रीनवरही एकत्र पाहायला मिळणार आहेत. पण त्यांनी अद्याप त्यांच्या आगमी प्रोजेक्टबद्दल माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

Story img Loader