महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अमृता फडणवीस अनेकदा त्या त्यांच्या गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळते. अलिकडेच त्याचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं त्यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात हजेरी लावली होती. ज्याचे प्रोमो सध्या बरेच चर्चेत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस ‘देवेंद्रजी जिंकू शकत नाहीत’ असं म्हणताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाण्याचा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सध्या भांडण, वाद, मैत्री या सगळ्याचं मिश्रण पाहायला मिळत आहे. अशात वेगवेगळ्या कलाकारही या शोमध्ये आठवड्याअखेर हजेरी लावताना दिसतात. यावेळी अमृता फडणवीस यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती आणि घरातील सदस्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.

आणखी वाचा-‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार अमृता फडणवीस, पाऊल ठेवताच म्हणाल्या, “मी आले असते तर…”

अमृता फडणवीस यांना यशश्री मसुरकरने प्रश्न विचारला होता की, “तुमच्या जोडीपैकी म्हणजेच देवेंद्र फडणवीस किंवा अमृता फडणवीस यांच्यापैकी कोणाला वाटतं की ते बिग बॉसमध्ये आले तर ते जिंकू शकतात?” यशश्रीच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्रजी जिंकू शकत नाहीत. कारण त्यांना घरी जायचं असतं ना. देवेंद्रजी बिग बॉस आहेत आणि मी सगळे निर्णय घेते.”

याशिवाय बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले किरण माने आणि यशश्री मसुरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना घरातील कॅप्टनपदावरुन काही प्रश्न विचारले होते. ‘बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाला फार महत्त्व आहे. ते खूप महत्वाचे असते. पण बिग बॉसच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, त्याचा कॅप्टन कोण?’ असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता.

आणखी वाचा- “भक्तीत तल्लीन व्हा…” दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

या प्रश्नाचं अमृता फडणवीसांनी फारच मिश्किलपणे उत्तर दिले. “मी तुम्हाला दोन नाव सांगते, सध्या ते महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत. यातील एक व्यक्ती प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन आहे. या कॅप्टनपैकी पहिले नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले कॅप्टन आहेत. दुसरे कॅप्टन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांचे हे उत्तर ऐकून बिग बॉसच्या घरातील सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. तसेच त्यांच्या या उत्तराचे कौतुकही केले.