‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वादग्रस्त असलेला हा शो घराघरात अतिशय आवडीने पाहिला जातो. नुकतंच या शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली. ‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीसांना पाहून सदस्यही आश्चर्यचकित झाले.

अमृता फडणवीस यांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांनी डान्स सादर केले. अमृता देशमुख, प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर यांनी ‘कजरा रे’ या गाण्यावर नृत्य केले. डान्समध्ये घरातील सदस्यांनी अमृता फडणवीस यांनाही सहभागी करुन घेतले. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी ठेका धरला.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट

हेही वाचा >> Video : सैफ अली खानची पॅण्ट खाली खेचत होता तैमूर अन्…; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा >>

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसाठी अमृता फडणवीसांनी त्यांच्या सुरेल आवाजात खास गाणीही गायली. ‘मनिके मागे हिथे’ हे गाणं अमृता यांनी गायलं. तर घरातील महिला वर्गासाठी त्यांनी गायलेल्या ‘कुणी म्हणाले वेडी कुठली’ या गाण्यातील काही बोल त्यांनी म्हणून दाखविले. त्यांनी गायलेल्या या गाण्यांवर घरातल्या सदस्यांनीही ठेका धरत कार्यक्रमात रंगत आणली.

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

‘बिग बॉस’च्या पुढील भागात घरातील सदस्य अमृता फडणवीसांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस मुलाखतीतून कोणते नवे खुलासे करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून उत्तम गायिकाही आहेत. त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दिवाळीनिमित्त त्यांच्या आवाजातील ‘लक्ष्मी आरती’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Story img Loader