उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ‘आज मैं मूड बना लिया’ हे त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. तर काही जणांनी या गाण्याला ट्रोलही केलं आहे.
नवीन गाण्यामुळे चर्चेत आलेल्या अमृता फडणवीसांनी नुकतंच बॉलिवूड स्पाय या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. अमृता यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. त्यानंतर त्या हिंदी बिग बॉसमध्ये येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. याबाबत त्यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, “मराठी बिग बॉसमध्ये मी पाहुणे कलाकार म्हणून गेले होते. परंतु, हिंदी बिग बॉसमध्ये येण्याचा कोणताही प्लॅन नाही”.
हेही वाचा>> “तिने लग्नाचा…”, शिव ठाकरेच्या आईचं वीणा जगतापबाबत मोठं विधान
‘बिग बॉस हिंदी’मध्ये मराठमोळा शिव ठाकरेची सध्या चर्चा आहे. यावरूनही अमृता यांना प्रश्न विचारण्यात आला. “बिग बॉस हिंदीमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला बघून कसं वाटतं?”, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “शिव ठाकरे खूप चांगला खेळ खेळत आहे. महाराष्ट्राचा मुलगा शिव ठाकरेचा मला अभिमान आहे”. अमृता फडणवीसांनी शिव ठाकरेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
हेही वाचा>> सोनू सूदने केलं प्राजक्ता माळीचं कौतुक, म्हणाला…
अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याला काही दिवसांतच मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता ‘आज मैं मूड बना लिया’ या गाण्यानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.