‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वी नवाकोरा कार्यक्रम ‘ड्रामा ज्युनिअर्स’ सुरू झाला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या कार्यक्रमात लहान मुलांचा उत्कृष्ट असा अभिनय पाहायला मिळत आहे. या लहान अतरंगी मुलांचं परीक्षण करण्याची जबाबदारी अभिनेत्री अमृता खान व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्यावर असून ते उत्तमरित्या पेलत आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर अमृता खानविलकर व संकर्षण कऱ्हाडे यांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. पण नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओत अमृता खानविलकर संकर्षणवर चिडलेली पाहायला मिळाली.

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्रामवर संकर्षण कऱ्हाडेबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, ती सुरुवातीला संकर्षणला वेळ विचारते. तेव्हा संकर्षण तिला कविता ऐकून दाखवतो. “वेळ काय झालीये पेक्षा आपली वेळ आता काय आहे, याला फार महत्त्व आहे अमृता.” मग अभिनेत्री म्हणते, “अरे बाबा, नाश्ताची वेळ झालीये का? काहीतरी मागवू या का?” तेव्हाही संकर्षण अमृताला कविता ऐकवतो. “किती दिवस पोट भरून खालं, कधीतरी आत्मा पोट भरल्यासारखा वागेल, शांत…” तितक्यात अमृता चिडते आणि संकर्षणला म्हणते, “ऐ तू गप्प बस. तू भोग आपल्या कर्माची फळं, मी माझा माझा नाश्ता करते. तू तुझी वाट शोध, फोनवर बस, काय वाटले ते कर. बाय.”

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Shocking video Groom sehra catches fire during photoshoot wedding video goes viral
VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा – Video: जब्या-शालूचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुम्ही लग्न करा…”

अमृताने हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “कवी मनाचा मित्र जेव्हा सध्याच्या गोष्टींमध्ये पण काव्य शोधतो…काय करावं सांगा?” अमृता व संकर्षणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात एन्ट्री, अंबानी-मर्चंट कुटुंबाने केलं जंगी स्वागत

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमात डफली वाजवत ओरीचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर २२ जूनपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होत आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सांभाळत आहे.

Story img Loader