अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठी बरोबरच हिंदी रिॲलिटी शो आणि चित्रपटांमध्येही काम करून तिने हिंदी सिनेसृष्टीतही तिचा ठसा उमटवला आहे. बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. ती लहान असताना तिने भर रस्त्यात एका सहा फूट उंच व्यक्तीला मारलं होतं असा खुलासा तिने केला आहे.
अमृता खानविलकर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. या एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान तिने तिच्या आयुष्यातील अनेक आठवणी शेअर केल्या. तर शाळेत असताना तिने एका व्यक्तीची भर रस्त्यात धुलाई केली होती असं सांगत तिने त्यावेळी काय घडलं होतं हे शेअर केलं.
आणखी वाचा : “दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे चांगला की प्रसाद ओक?” अमृता खानविलकरने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…
अमृता म्हणाली, “मी सहावी-सातवीत असेन. आम्ही कुठून तरी येत होतो. तेव्हा मी शाळेचा युनिफॉर्म घातला होता आणि गळ्यात प्लास्टिकची वॉटर बॅग अडकवली होती. आम्ही जात असताना एक मारुती सुझुकी गाडी असलेला माणूस आम्हाला आडवा गेला. माझ्या बाबांची उंची पाच फूट दोन इंच वगैरे होती. पण त्यांना असं फार वाटे की मी कोणाला तरी धरून मारू शकतो. तर ते रागा रागात त्याच्याशी भांडायला गेले आणि एक पुणेरी शिवीगाळ झाली. तो गाडीवाला खरंच पुढे जाऊन थांबला आणि त्यातून एक सहा फुटी उंच माणूस उतरला.”
पुढे ती म्हणाली, “त्या माणसाने “काय रे काय बोललास?” असं म्हणत फक्त माझ्या बाबांची कॉलर धरून असं उचललं. मग मी मागून जाऊन त्या माणसाच्या अंगावर उडी मारली. आणि माझ्या प्लास्टिकच्या वॉटर बॉटलने त्याच्या डोक्यात मारत होते आणि मी रडत होते. काय माहिती तो माझ्या बाबांना तो काय करणार, असं मला वाटत होतं. हे सगळं झाल्यावर मी जवळपास एक तास रागाने धुमसत होते.” आता तिचा हा व्हिडिओ समोर आल्यावर या एपिसोडबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आणखीनच वाढली आहे.