मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अमृताने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकरत प्रेक्षकांना आपलसं केलं. शिवाय बॉलिवूडमध्येही ती स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी अधिकाधिक मेहनत करत आहे. अमृता तिच्या कामाबरोबरच फिटनेसकडेही अधिकाधिक लक्ष देताना दिसते. आता यावरुनच तिचा एक गंमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप
अमृताने झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. हा भाग आज सर्वत्र प्रसारित होईल. पण त्याचपूर्वी या नवीन भागाचा एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेया बुगडे पत्रकाराचं पात्र साकारत अमृताशी संवाद साधताना दिसत आहे.
श्रेया म्हणते, “गेले कित्येक वर्ष अमृता लोकांची दिशाभूल करत आहे. अभिनय हे तिचं करिअर नाही. माझ्याकडे पुरावाही आहे”. श्रेयाचं हे म्हणणं ऐकून सुरुवातील अमृताही थक्क होते. पण नंतर मात्र हसू लागते. श्रेया पुरावा म्हणून एक व्हिडीओ दाखवायला सांगते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच हसू अनावर होतं.
“अमृता यांचं पंक्चर काढण्याचं दुकान आहे” असं श्रेया म्हणते. दरम्यान अमृता व्यायामाचा एक प्रकार म्हणून टायर उचलताना दिसत आहे. तसेच व्यायाम करत आहे. हा व्हिडीओ पाहून उपस्थितही पोट धरुन हसू लागतात. नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ पाहून गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. तर अमृताही अगदी पोट धरुन हसू लागते.