अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या हिंदी कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील बहुचर्चित डान्स शोमध्ये तिने सहभाग घेतला. एकापेक्षा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत ती प्रेक्षकांचं तसेच शोच्या परीक्षकांचं मन जिंकत आहे. अमृताने मेहनत करत कलाक्षेत्रात स्वतःचं नाव कमावलं. पण तुम्हाला माहित आहे का? या संपूर्ण प्रवासामध्ये तिची आई तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आजही जिथे अमृता असते तिथे तिची आई तिच्याबरोबर असते. अमृताची आई ‘झलक दिखला जा’च्या सेटवरही पोचली होती.

अमृताला संधी मिळताच आपल्या आईचं ती तोंडभरून कौतुक करताना दिसते. एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण असो वा एखादा शो तिची आई तिच्या बरोबर नेहमीच असते. आताही ‘झलक दिखला जा’मध्ये अमृता परफॉर्मन्स करत असताना तिची आई प्रेक्षकांमध्ये बसली होती. इतकंच नव्हे तर अमृताचा डान्स पूर्ण झाल्यानंतर तिने शोचे परीक्षक नीतू कपूर, माधुरी दीक्षित यांच्याबरोबर ‘मेरा पिया घर आया’ या गाण्यावर ठेका धरला.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

पाहा व्हिडीओ

“अगदी लहान वयामध्ये तुमचं लग्न झालं आहे असं मी ऐकलं आहे. माझंही वय वर्ष २२ असताना लग्न झालं. तुमची काय इच्छा अपूर्ण राहिली असेल तर आम्हाला सांगा.” असे नीतू कपूर अमृताच्या आईला विचारतात. यावेळी अमृताची आई म्हणते, “माझ्या मुलीने मेहनत करून सारं काही कमावलं आहे. मला फक्त तुमच्याबरोबर तसंच माधुरी दीक्षित यांच्याबरोबर डान्स करायचा आहे.”

आणखी वाचा – खासगी MMS व्हिडीओ लीक झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुमच्या आई-बहिणींबरोबर…”

अमृताच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी नीतू कपूर, माधुरी दीक्षित दोघीही मंचावर येतात. तसेच नीतू-माधुरी यांच्याबरोबर अमृताची आई धमाल डान्स करताना दिसत आहे. हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच काकू एकदम कमाल डान्स केला अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader