Amruta Khanvilkar and Sankarshan Karhade Video :  ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम सुरू झाल्यापासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमी दोघं चर्चेत असतात. या कार्यक्रमात दोघं परीक्षकाची जबाबदारी पार पाडत असले तरी दुसऱ्याबाजूला दोघांचे मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी संकर्षण ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेला होता. पण तो आता परत आला आहे. यानिमित्ताने अमृताने त्याला काही गोष्टी विचारत होती. मात्र यावेळी संकर्षणने असं काही केलं की अमृता चिडली आणि निघून गेली. नेमकं काय घडलं? पाहा.

“संकर्षण कऱ्हाडे परत आला खरं, पण मला याला परत पाठवायचं आहे. काय वाटतं तुम्हाला?”, असं कॅप्शन देत अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अमृता उत्साहात म्हणते की, “…आणि संकर्षण परत आला…काय मग संकर्षण? इथलं काय मीस केलंस?” संकर्षण म्हणतो, “मी खरं सांगतो. तुला…म्हणजे तुला सांगतो, इथलं वातावरण खूप मीस केलं. इथलं खाणं खूप मीस केलं. तरीदार मिसळ, लिंबू पिळून, कांदा घालून… ते अमेरिकेला नव्हतं.” त्यानंतर अमृता म्हणते, “अरे ते नाही. इथलं (सेटवरचं) असं काय मीस केलंस?” संकर्षण म्हणतो की, मी ना इथलं तुला…म्हणजे तुला सांगतो, इथले चॉकलेट्स फार मीस केले. परीक्षक असल्यामुळे फुकटात मिळतात ना. विमानतळावरती विकत घ्यावे लागतात.”

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा

हेही वाचा – Video: “तोंड शिवलं होतं का?” धनंजय आणि घनःश्याममध्ये पडली वादाची ठिणगी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरी दणका…”

संकर्षणचं हे उत्तर ऐकून अमृता त्याला नीट समजवते. म्हणते, “अरे संकर्षण तू इथलं कोणीतरी सुंदर, गोड असणारी किंवा असणारा असं एखादं व्यक्तिमत्व मीस नाही केलंस का?” अभिनेता म्हणतो, “याचं उत्तर फक्त एक सांगतो मी असं सुंदर, छान असणारं तुला…म्हणजे तुला सांगतो, मला वॉशरुमला जायचं आहे. खूप जोराची आली आहे. पाऊस पडतो आणि आपण त्यात पाणी खूप पितो ना. थांब एका मिनिटात आलो.” संकर्षणची ही उत्तर ऐकून अखेर अमृता ( Amruta Khanvilkar ) चिडते आणि म्हणते, “जा बुड, मर त्या पाण्यात…” हे बोलून अमृता निघून जाते. पण तितक्यात संकर्षण येतो आणि म्हणतो, “खरं सांगू. पण सांगू नका. मी अमृताला फार मीस केलं.”

अमृता व संकर्षणचा व्हिडीओ पाहा

हेही वाचा – Video: “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है…”, अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तीन तासांत मिळाले फक्त ‘इतके’चं व्ह्यूज

Amruta Khanvilkar And Sankarshan Karhade
Amruta Khanvilkar And Sankarshan Karhade

अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) व संकर्षण कऱ्हाडेच्या या मजेशीर व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी संकर्षण कऱ्हाडेला खूप मीस केल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी दोघांच्या बोडिंगचं कौतुक केलं आहे.

Story img Loader