अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठीसह तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनयाबरोबरच ती उत्तम डान्सर म्हणून ओळखली जाते. नुकत्याच एका कार्यक्रमात तिने बालपणीचा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, जुई गडकरीने शेअर केला पडद्यामागचा व्हिडीओ

अभिनेत्री अमृता खानविलकर अलीकडेच ‘खुपते तिथे गुप्ते’ या अवधूत गुप्तेंच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी अवधूत गुप्तेंनी तिला, “ज्या अमृता खानविलकरच्या सह्या घेण्यासाठी आज चाहते उत्सुक असतात तिच अमृता बालपणी वडिलांच्या खोट्या सह्या करायची? हे खरंय का?” असा प्रश्न विचारला.

अवधूत गुप्तेंच्या प्रश्नाला उत्तर देत अमृता म्हणाली, “हे अगदी खरंय…कारण, लहानपणी मी खूप वात्रट होते. मला अभ्यास करायला अजिबात आवडायचं नाही. शाळेत खिडकीच्या बाजूला बसल्यावर मी कावळा काढ, चिमणी काढ असे प्रकार करायची…वर्गात माझं लक्ष नसायचं त्यामुळे शिक्षकांकडून ओरडा मिळायचा. माझ्या प्रगतीपुस्तकावर शिक्षक तक्रारी लिहून द्यायचे आणि सही आणायला सांगायचे. मग मी त्यांची खोटी सही करायची.”

हेही वाचा : Video : पहिल्या केळवणात अमृता देशमुख-प्रसाद जवादेने घेतले सुंदर उखाणे; ८७ वर्षांच्या आजोबांनी केलं लाडक्या नातीचं केळवण

अमृता पुढे म्हणाली, “एकदा मला आमच्या मॅडमनी आई-वडिलांना बोलावून घे असं सांगितलं. आई बाबा आल्यावर, तुमच्या मुलीच्या १८ तक्रारी लिहून दिल्या आहेत. तुम्ही सतत सह्या करून का देता? तिला काहीतरी बोला अशी तक्रार मॅडमनी बाबांकडे केली. बाबांना मॅडमनी सह्या दाखवल्या…माझे बाबा म्हणतात ‘अरे, ही कोणाची सही आहे?’ मग माझ्या घरी खोट्या सह्यांचा प्रकार समजला.”

हेही वाचा : अभिज्ञा भावेच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

“बाबांनी घरी आल्यावर मला रात्रभर ओणवं उभं केलं होतं. पाठीवर पुस्तक ठेऊन मला शिक्षा केली होती. असं सगळे बालपणीचे किस्से आहेत.” असं अमृताने सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री लवकरच ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.