Amruta Khanvilkar : गेल्यावर्षी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या सर्व चाहत्यांना नवीन घर घेतल्याची बातमी दिली होती. आपलं हक्काचं आणि प्रशस्त मोठं घर असावं असं अमृताचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. अमृताने नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर तसेच युट्यूब चॅनेलवर सुद्धा शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता खानविलकरने तिच्या नव्या घराला ‘एकम’ असं नाव दिलं आहे. “स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’…’एकम’ म्हणजे एक- जिथून सगळंच नव्याने सुरू होतं, उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ.” असं कॅप्शन देत अमृताने तिच्या नव्या घराविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमृताची सख्खी बहीण व तिची दोन्ही लहान मुलं सुद्धा या गृहप्रवेश पूजेला उपस्थित होती. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर नकारात्मक कमेंट्स केल्या होत्या. अशा युजर्सला अमृताने रोखठोक उत्तरं देत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?

एका नेटकऱ्याने अमृताच्या व्हिडीओवर कमेंट करत “या सोहळ्यात तुझा नवरा कुठे आहे?” असा प्रश्न विचारला होता. यावर अमृताने, “जा आणि माझा युट्यूब व्हिडीओ बघा…( Go watch the video its on youtube )” असं उत्तर दिलं आहे. तर, दुसऱ्या एका युजरने व्हिडीओवर खोचक कमेंट करत अमृता आणि हिमांशूच्या नात्याबद्दल नकारात्मक कमेंट केली आहे. या नेटकऱ्याला अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं आहे.

“यात काय weird काय आहे? त्याला गृहप्रवेश पूजेला पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला. सगळेच मला या गोष्टीवरून बोलत आहेत… तू एक फेसलेस व्यक्ती आहेस, जी डीपी सुद्धा ठेवत नाही आणि नकारात्मक विचार करते. जर कलाकार काही बोलत नाहीयेत, याचा अर्थ असा नाहीये की ते कधीच काही बोलणार नाहीत. जरा सांभाळून बोलत जा. आई, वडील, बहीण हे आपलं कुटुंब नसतं का? की नवराच सर्वस्व आहे तुमचं? तसं असेल तर फारच बिचाऱ्या आहात तुम्ही आणि तुमचं आयुष्य” असं रोखठोक उत्तर देत अमृताने संबंधित युजरला चांगलंच सुनावलं आहे.

हेही वाचा : Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”

Amruta Khanvilkar

दरम्यान, अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर अमेय वाघ, शुभंकर तावडे, राजसी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar slams netizen who is asking about her husband says go and watch whole video sva 00