Anant-Radhika Wedding: अखेर अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांची लग्नगाठ बांधली गेली आहे. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये १२ जुलैला रात्री मोठ्या धूमधडाक्यात अनंत-राधिकाचा लग्नसोहळा पार पडला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी लेक राधिका आता अंबानींची सून झाली आहे. अनंत-राधिकाच्या या शाही लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातून दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे विदेशातील पाहुण्यांनी खास भारतीय पोशाख परिधान केला होता. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नातील फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण अशातच अनंत अंबानीच्या लग्नातील एका हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लूकमध्ये तो स्नीकर्सवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनंतच्या या लूकची चर्चा होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं लग्न हिंदू पद्धतीने पार पडलं. या लग्नात वेगवेगळ्या लूकमध्ये अनंत पाहायला मिळाला. वरातीसाठी अनंतने केशरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. ज्यावर मुकेश अंबानींच्या लाडक्या मुलाने स्नीकर्स घातले होते. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वतःच्याच शाही लग्नसोहळ्यात अनंतला स्नीकर्सवर पाहून अनेकांना नव्वल वाटलं. पण अनंतच्या या स्नीकर्सची किंमत लाखोंमध्ये आहे.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात केला भांगडा; लग्न लागताच पत्नी राधिकासह केला ‘अशाप्रकारे’ आनंद व्यक्त

अनंत-राधिका अंबानी लग्नसोहळा (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

आजकाल स्नीकर्स खूप ट्रेंडमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्या लग्नात आणि रिसेप्शनमध्ये स्नीकर्स घालत असतात. हाच ट्रेंड अनंत अंबानीने फॉलो केला आणि स्वतःच्या लग्नासाठी त्याने खास हे स्नीकर्स पॅरिसहून मागवले. माहितीनुसार, प्रसिद्ध शूज ब्रँड असलेल्या Berlutiचे हे स्नीकर्स आहेत. Berlutiच्या अधिकृत वेबसाईटवर या स्नीकरचं नाव ‘फास्ट ट्रॅक स्क्रिटो लेदर स्नीकर’ (Fast Track Scritto Leather Sneaker) असं आहे. हे स्नीकर तयार करण्यासाठी वेनेजिया लेदरचा वापर केला गेला आहे. या स्नीकरची किंमत जवळपास १.६७ लाख रुपये आहे.

एवढंच नव्हे तर नवरदेव अनंत अंबानीच्या लूकसाठी हे स्नीकर्स खास तयार केले आहेत. यामध्ये सोन्याचा वापर करून त्यावर वर्क केलं आहे. त्यामुळेच स्नीकर्स शेरवानीवर आणखी चांगले उठून दिसत आहेत.

हेही वाचा – Video: वरातीत अनंत अंबानीचा सेलिब्रिटींसह ‘झलक दिखला जा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, तर ईशा अंबानी थिरकली ‘लाल घाघरा’ गाण्यावर

हेही वाचा – Video: “सगळ्यांची वाजणार, हा सीझन गाजणार…”, ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू

अनंत-राधिकाची प्रेमकहाणी (Anant-Radhika Love Story)

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघं एकत्रच मोठे झाले. त्यामुळेच लहापणापासूनच दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा माध्यमांसमोर केला नाही. २०१८मध्ये पहिल्यांदा अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता. त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत-राधिका जामनगरमध्ये अडकले होते. त्यावेळेस राधिकाने अनंतवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला होता. अनंतने देखील आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला आपली ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani wore berluti sneakers with sherwani in wedding know shoes price pps