चित्रपट, मालिका यांच्या शूटिंगदरम्यान अनेक किस्से कलाकारांकडून ऐकायला मिळतात. अनेकदा मनोरंजक किस्से ऐकायला मिळतात, तर कधी कधी अपघातदेखील होतात. शूटिंगदरम्यान एखादा ॲक्शन सीन करताना दुखापत झाल्याच्या घटना अनेकदा घडल्याचे पाहायला मिळते. ‘द सॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ या मालिकेच्या सेटला आग लागल्याची आठवण आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

टेलिव्हिजनवर दिसणारा ९० च्या दशकातील सर्वात हँडसम म्हणून संजय खान या अभिनेत्याची ओळख होती. त्यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते आणि १८ व्या शतकातील म्हैसूरचा राजा टिपू सुलतानची भूमिकादेखील निभावली होती. ८ फेब्रुवारी १९८९ ला प्रीमिअर स्टुडिओला आग लागली, जिथे शूटिंग होणार होते. आग विझवण्याची साधने नसल्याने आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्याने ५२ क्रू मेंबरना त्यांचा जीव गमवावा लागला. ७८ वर्षीय अभिनेता संजय खान यांच्यावर ७३ सर्जरी कराव्या लागल्या. त्यांनी १३ महिने उपचार घेतले. हा शो संपवण्यासाठी ते परत आले. आता या मालिकेचा भाग असणारे अनंत माधवन(Ananth Mahadevan) यांनी या प्रसंगाची आठवण सांगितली आहे.

R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

अनंत माधवन यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाची आठवण सांगितली आहे. त्यांनी म्हटले, “ज्या दिवशी मला म्हैसूरला स्टुडिओमध्ये विमानाने प्रवास करून जायचे होते, त्यादिवशी माझा ड्रायव्हर आला नाही. मी गडबडीत टॅक्सी घेतली आणि कसातरी वेळेत विमानतळावर पोहोचलो. जेव्हा मी बेंगलोरमध्ये पोहोचलो, तेव्हा मला कोणीही न्यायला आले नाही. कुठे जायचे हे मला कळत नव्हते. मग मी एक टॅक्सी केली आणि त्या ड्रायव्हरला मला प्रीमिअर स्टुडिओला पोहोचवायला सांगितले. हा प्रवास तीन तासांचा होता.”

“वाटेत टॅक्सी तीनवेळा बंद पडली. असे वाटत होते की हा कसलातरी संकेत आहे, जो मला सांगत आहे की जाऊ नको, इथेच थांब. मी ५ वाजता सेटवर पोहोचलो. संजय खान दिवाळीच्या सीनचे दिग्दर्शन करत होते. गाव असलेला हा सेट होता, ज्याच्या सर्व बाजूंनी गवत होते. छताची उंचीदेखील कमी होती. मी खान साहेब यांना म्हटले, आपण हे मुंबईच्या फिल्मसिटीमध्येदेखील शूट करू शकलो असतो. त्यांनी मला जवळचा एक महाल बघून येण्याचे सुचवले. मी गेलो, काही वेळाने परत आलो आणि सेटच्या बाहेरच्या बाजूला बसलो. मला हॉटेल रूममध्ये जाऊन आराम करायचा होता, त्यामुळे इतर चार-पाच जणांबरोबर मी हॉटेलमध्ये गेलो. तोपर्यंत आम्हाला निरोप मिळाला की सेटला खूप मोठी आग लागली आहे.”

“मी परत सेटच्या ठिकाणाजवळ गेलो. तिथे संतापजनक गावकरी जमा झाले होते. मी काही मृतदेहदेखील पाहिले. गावकरी संतापाच्या भरात काहीही करू शकतात, त्यामुळे मी पळून जावे असे कोणीतरी मला सुचवले. माझ्यासाठी ती रात्र खूप क्लेशदायक होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही बातमी वणव्यासारखी पसरली. आम्ही जिवंत आहोत की नाही, याची कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही आमच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराला फोन करून जिवंत असल्याचे कळवले. प्रत्येकाने मला हे सांगितले की, तू तुझी भूमिका आणि काम दोन्ही गमावले आहेस. हे कधीही भरून निघणार नाही. काय करावे हे कळत नव्हते, मी नैराश्यात चाललो होतो.”

या घटनेच्या सहा महिन्यांनंतर संजय खान यांचे बंधू अकबर खान यांनी या मालिकेचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले. त्यांनी परत कास्टिंग करायला सुरुवात केली. मी जी भूमिका साकारणार होतो, त्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका अभिनेत्याची निवड केली होती. मला हे समजल्यानंतर मी त्यांना त्यांच्या घरी भेटायलो गेलो आणि त्यांना सांगितले की, तुमच्या भावाने ही भूमिका साकारण्यासाठी माझी निवड केली होती. त्यावर त्यांनी मला अस्पष्ट उत्तरे दिली, मात्र त्या भूमिकेसाठी माझा फोटो लावला गेला.”

हेही वाचा: “अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

संजय खान यांच्या तब्येतीविषयी बोलताना अनंत माधवन यांनी म्हटले, “ज्या इस्पितळात त्यांना दाखल केले होते, तिथे मी पोहोचलो. त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. मी त्यांना काचेतून बघितले. डॉक्टर त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार करता येतील याचा अंदाज घेत होते. जेव्हा अकबर खान यांनी दिग्दर्शन करत मालिका सुरू केली, त्याच्या सहा महिन्यांनंतर संजय खान बरे होऊन शूटिंगसाठी येऊ लागले. त्यांच्याशिवाय आधी २५ एपिसोड झाले होते. मानसिक, शारीरिक आघातांवर मात करत त्यांनी स्वत:ला टिपू सुलतान म्हणून उभे केले. हे करण्यासाठी खूप धाडस लागते. त्यांच्या चेहऱ्यासहित ते खालून वरपर्यंत संपूर्ण भाजले होते. मी त्यांना मुंबईत आल्यानंतर भेटलो होतो, फिनिक्स पक्षाप्रमाणेच त्यांनी आगीतून झेप घेतली होती”, अशी आठवण अभिनेत्याने सांगितली आहे.

Story img Loader