Marathi Actor Post On Anant Ambani Wedding : अंबानींच्या घरच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. या लग्नसोहळ्याला हॉलीवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते. जॉन सीना, किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत आले होते. शाहरुख सुद्धा खास या लग्नासाठी वांद्रे येथील घरी परतला होता. त्यामुळे दिवसभर सर्वांचं लक्ष अनंत-राधिकाच्या भव्य विवाहसोहळ्याकडे होतं. याबद्दल एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अंबानींच्या घरच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. याबाबत ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेता सौरभ चौघुलेने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. अनंत – राधिकाच्या लग्नासाठी जगभरातील दिग्गज भारतात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. किम कार्दशियन तर यानिमित्ताने पहिल्यांदाच भारतात आली होती. या सगळ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय जॉन सीनाने अंबानींच्या लग्नात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. मराठी अभिनेत्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
अंबानींच्या लग्नसोहळ्याबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेता सौरभ चौघुले याबद्दल म्हणतो, “जॉन सीना पण अंबानींच्या लग्नात…? शक्तिमान, अलादिन, अलीबाबा त्याचे ४० चोर, शिनचॅन हेच काय ते उरलेत बाकी सगळे तर तिथेच आहेत…”
हेही वाचा : Kim Kardashian : लाल शिमरी साडी, डीपनेक ब्लाऊज…; अनंत अंबानीच्या लग्नात किम कार्दशियनचा लूक चर्चेत
सौरभ चौघुलेप्रमाणे यापूर्वी गौरी कुलकर्णी, सौरभ गोखले अशा काही मराठी कलाकारांनी देखील या लग्नसोहळ्याबद्दल भाष्य केलं होतं. याशिवाय अमृता खानविलकर, श्रेयस राजे या मराठी कलाकारांना अंबानींच्या लग्नसोहळ्याचं निमंत्रण देखील पाठवण्यात आलं होतं. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर आता रविवारी ( १४ जुलै ) सायंकाळी अंबानी कुटुंबीयांनी सगळ्या पाहुण्यांसाठी भव्य रिसेप्शन पार्टीचं मुंबईत आयोजन केलं आहे.
दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला आलिया- रणबीर, विकी-कतरिना, जान्हवी कपूर, शिखर व वीर पहारिया, खुशी कपूर, सुहाना खान, शाहरुख व गौरी, आर्यन खान, अनन्या पांडे, वरूण धवन, रणवीर-दीपिका, माधुरी दीक्षित, रितेश-जिनिलीया, सलमान खान असे बरेच कलाकार उपस्थित होते.