Anita Hassanandani Worked as a Receptionist: ‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी तिच्या बालपणातील संघर्षाबाबत खुलासा केला आहे. तिचे वडील दारू प्यायचे, त्यामुळे घरात तणावाचं वातावरण असायचं, त्याचा तिच्यावर कसा परिणाम झाला ते सांगितलं. ती अवघ्या १५ वर्षांची असताना त्याचा मृत्यू झाला आणि तिने आईचं आणि तिचं पोट भरण्यासाठी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. वडिलांच्या व्यसनाचा राग यायचा असंही अनिताने सांगितलं.
वडिलांच्या निधनाचा कसा परिणाम झाला याबद्दल बोलताना अनिता भावुक झाली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “ते दारू प्यायचे, त्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावले होते, पण ते माझे वडील होते. मी आजपर्यंत कधीच माझ्या वडिलांबद्दल बोलले नाही. पण मला त्यांची खूप आठवण येते. आता मला एक मुलगा आहे, त्यामुळे मला वाटतं की माझे बाबा आरवला (तिचा मुलगा) भेटले असते तर तो क्षण किती खास असता.”
वडिलांची माफी मागावी वाटते- अनिता
वडील दारू प्यायचे या गोष्टीचा राग यायचा, पण आता तिला त्यांची माफी मागावी वाटतेय, असं ती म्हणाली. “ते दारू प्यायचे त्यामुळे मी नेहमी त्यांच्यावर चिडायचे. मला माहीत नाही का, पण आता मला कळालं की ते एक व्यसन आहे. ते कोणत्या परिस्थितीतून जात होते, ते त्यांनाच माही. त्यावेळी मी त्यांना समजून घेतलं नाही, यासाठी मला त्यांची माफी मागावी वाटते,” असं अनिताने सांगितलं.
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
अनिता अवघ्या १५ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्या मायलेकींसमोर उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा ठाकला. “मी १५, साडेपंधरा वर्षांची असेन. मी लहान असल्यामुळे नक्की काय करावं ते कळत नव्हतं. माझी आई आणि आम्ही दोन बहिणी होतो. बहिणीचं लग्न झालं होतं. त्यामुळे आता जगायचं कसं? हा प्रश्न आमच्यासमोर होता. पण असं म्हणतात ना की ‘जेव्हा एक दरवाजा बंद होतो आणि दुसरा उघडतो'” असं अनिता म्हणाली.
अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या
रिसेप्शनिस्ट म्हणून केलं काम
वडिलांच्या निधनानंतर ती कमावणारी घरात एकटीच होती का, असं विचारल्यावर अनिताने पहिल्या नोकरीबद्दल सांगितलं. “सर्वात आधी मी खरंच नोकरी शोधली. मी मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट होते. खरं तर, त्याचा भाऊच मला म्हणाला, ‘तू फोटोशूट का करून घेत नाहीस?’ तिथूनच इकडचा प्रवास सुरू झाला. आता बरीच वर्षे झाली आहे, मी त्यांना तेव्हापासून भेटले नाही. पण आज संधी मिळतेय तर मला आयुष्यात दिशा दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी त्या ऑफिसमध्ये काही वर्षे काम केलं होतं, त्यानंतर फोटोशूट, ऑडिशन, लूक टेस्ट या सर्व प्रवासानंतर आज मी इथे आहे,” असं अनिता म्हणाली.
अनिता हसनंदानीचे करिअर
अनिता हसनंदानीने प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘इधर उधर सीझन २’मधून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये तिने ‘नुव्वु नेनू’ या चित्रपटातून तिने तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं. २००२ मध्ये समुराई आणि वरुशमेल्लम वसंतम हे तमिळ सिनेमे तिने केले. २००३ मध्ये तिने ‘कुछ तो है’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिने ‘कृष्णा कॉटेज’ आणि ‘कोई आप सा’ या चित्रपटांमध्येही काम केलंय.
© IE Online Media Services (P) Ltd