अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘नागिन’ फेम अभिनेत्री तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनिताने एका मुलाखतीत तिला शाळेत असताना आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. फक्त ९-१० वर्षांची असताना अनिताला हा वाईट अनुभव आला होता.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अनिता हसनंदानीने सांगितलं की शाळेत असताना एक रिक्षावाला खूप विचित्र वागायचा. त्या रिक्षावाल्याच्या भीतीने शाळेत जायचा रस्ता बदलला होता. “आम्ही शाळेत होतो, तेव्हा आई आम्हाला रिक्षाने जाण्यासाठी १० रुपये द्यायची आणि परत येताना आम्ही चालत यायचो. आम्ही कधीतरी कँटिनमध्ये सामोसे किंवा इतर काहीतरी खायला पैसे वाचवायचो, त्यामुळे चालत यायचो,” असं अनिता म्हणाली.

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

ती पुढे म्हणाली, “रस्त्यावर एक रिक्षाचालक रोज उभा राहायचा. तो त्याची पॅन्ट काढायचा आणि रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींना पाहून स्वतःला स्पर्श करायचा. आमच्याकडेही घाणेरड्या नजरेने बघायचा.” ९-१९ वर्षांची असताना मुंबईतील खार भागात ही घटना घडली होती. यानंतर त्या रस्त्याने शाळेत जाणं सोडलं असं अनिताने सांगितलं. पण नंतरही तिला भीती वाटायची की तो रिक्षावाला त्यांचा पाठलाग तर करत नाही ना. आम्ही जायचो ती शाळा फक्त मुलींची होती. “त्याला रस्ता माहीत होता आणि त्याच्याकडे रिक्षाही होती, त्यामुळे शाळेच्या आजूबाजूला रिक्षा आली की आम्ही घाबरायचो,” असं अनिता म्हणाली.

घटस्फोटित बॉलीवूड अभिनेत्याशी आंतरधर्मीय लग्न केल्यावर मराठमोळी शिबानी झालेली ट्रोल; म्हणाली, “मला लव्ह जिहाद…”

अनिताने याच मुलाखतीत सांगितलं की ती १५ वर्षांची असल्यापासून काम करतेय, त्यामुळे तिला घरातील कामांची फार माहिती नव्हती. लग्नानंतर घर सांभाळणं फार आव्हानात्मक होतं, असंही तिने नमूद केलं.

अनिता हसनंदानीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘इधर उधर सीझन २’मधून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. जवळपास २५ वर्षांपासून ती इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. २००१ मध्ये तिने ‘नुव्वु नेनू’ या चित्रपटातून तिने तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं. २००२ मध्ये समुराई आणि वरुशमेल्लम वसंतम हे तमिळ सिनेमे तिने केले. २००३ मध्ये तिने ‘कुछ तो है’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिने ‘कृष्णा कॉटेज’ आणि ‘कोई आप सा’ या चित्रपटांमध्येही काम केलंय.