‘बिग बॉस १६’ मध्ये या आठवड्यात वाईल्ड कार्ड स्पर्धक विकास मानकतला बाहेर पडला. त्यापूर्वीच्या आठवड्यात अंकित गुप्ताचा या शो मधील प्रवास संपला. अंकित घराबाहेर आल्यानंतर त्याची जवळची मैत्रीण प्रियांका चहर चौधरीला पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, अंकित बाहेर पडल्यानंतर दोन्ही ‘विकेंड का वार’मध्ये सलमानने प्रियांकाला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं होतं. यावरून अंकितने अप्रत्यक्षपणे सलमानवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलगा ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी घरी आणणार का? पहिल्यांदाच शिव ठाकरेच्या आईने दिलं उत्तर, म्हणाली, “माझा लेक…”

अंकित गुप्ताने त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो, “प्री (प्रियांका), हाय, मला माहीत आहे की घरातील सर्वजण विनाकारण तुला टार्गेट करत आहेत. विकेंड का वारमध्येही तुला कोणतंही कारण नसताना फटकारलं जात आहे. मला खरोखर वाटतं की मी तिथे असायला हवं होतं. पण दुर्दैवाने मी तिथे नाही. मला हे देखील माहित आहे की तू खूप स्ट्राँग आहेस. तू हे सर्व चांगल्या प्रकारे हाताळशील आणि बॉससारखं अभिमानाने आणि हसत बाहेर येशील.”

तुनिषा शर्मा प्रकरणात अटकेत असलेल्या शिझान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा…”

पुढे अंकित म्हणाला, “काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या समर्थनासाठी आहोत. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस, आपले फॅन क्लब तुला सपोर्ट करतील. तू फक्त स्वतःची काळजी घे आणि पटकन जिंकून ये, आम्ही सर्वजण मिळून तुझा विजय साजरा करू,” असंही अंकित या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय.

भगव्या बिकिनीनंतर ‘पठाण’चं ‘बेशरम रंग’ गाणं पुन्हा वादात; Video शेअर करत पाकिस्तानी गायकाचा आरोप

‘विकेंड का वार’मध्ये सलमानने प्रियांका स्वतःला समजदार समजून सर्वच विषयांवर बोलते आणि सोईचा गेम खेळते असं सलमानने म्हटलं होतं. तसेच ती स्वतःला सत्याची देवी समजते, असंही तो म्हणाला होता. यावरूनच अंकितने निशाणा साधलाय आणि विनाकारण सलमानसह घरातील सदस्यांकडून प्रियांकाला टार्गेट केलं जात असल्याचं तो म्हणतोय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankit gupta slams salman khan and bigg boss 16 makers for targeting priyanka chahar chaudhari hrc