छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. या शोमध्ये अनेकदा ती तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसते. अंकिता व सुशांत यांनी ‘झलक दिखला जा’च्या चौथ्या सीझनमध्ये भाग घेतला होता. दरम्यान, अंकिताने सुशांतबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, ‘सीआयडी’ फेम ‘दया’ची माहिती; म्हणाले, “डॉक्टर…”

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण

बिग बॉसच्या घरात अंकिता ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्याबरोबर गप्पा मारत होती. यावेळी अंकिताने ‘झलक दिखला जा’ या डान्स शोदरम्यानची सुशांतची एक आठवण शेअर केली आहे. अंकिता म्हणाली की, ‘झलक दिखला जा’मध्ये पहिल्या परफॉर्मन्समध्येच सुशांतला चांगले गुण मिळाले होते. हे पाहून मला त्याचा खूप हेवा वाटू लागला. एकदा डान्स करताना सुशांतची डान्स पार्टनर त्याच्या मांडीवर बसली होती हे बघून मला खूप त्रास झाला. मी खूप पझेसिव्ह मुलगी आहे. मला सुशांतचा खूप राग आला होता. पूर्वी मला छोट्या छोट्या गोष्टींवर खूप राग यायचा; पण आता येत नाही.

याआधीही अंकिताने बिग बॉसच्या घरात अनेकदा सुशांत आणि तिच्या नात्यावर भाष्य केले होते. काही दिवसांपूर्वीच अंकिताने सुशांतबरोबरच्या ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासा केला होता. अंकिता म्हणालेली “सुशांत एका रात्रीत बदलला. एकीकडे त्याला यश मिळत होतं; तर दुसरीकडे लोक त्याचे कान भरत होते. मला सुशांतच्या डोळ्यांत ते प्रेम दिसतच नव्हतं.”

हेही वाचा- शिवानी सुर्वेला दोन-तीन दिवसांतच ‘या’ लोकप्रिय हिंदी मालिकेतून टाकलं होतं काढून, अभिनेत्री स्वतः किस्सा सांगत म्हणाली…

अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये एकत्र दिसले होते. दोघे सात वर्षं रिलेशनशिपमध्ये होते; पण २०१६ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी आली. सुशांतच्या आत्महत्येमुळे अंकिताला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या धक्क्यातून सावरल्यानंतर अंकिताने २०२१ मध्ये तिचा जवळचा मित्र विक्की जैन याच्याबरोबर लग्नगाठ बांधली.

Story img Loader