मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचली. अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. नुकतंच तिने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता लोखंडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने “आम्ही पुन्हा विवाहबंधनांत अडकलो”, असे म्हटले आहे. अंकिताने तिचा पती विकी जैनबरोबर ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे.
आणखी वाचा : अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच होणार आई? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

या व्हिडीओत विकी हा रोमँटिक पद्धतीने गुडघ्यावर बसून अंकिताला प्रपोज करताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही एकमेकांना लिप किस करतानाही पाहायला मिळत आहेत.

अंकिताने यावेळी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर विकीने पांढऱ्या रंगाचा थ्री पीस सूट परिधान केला होता. यावेळी ते दोघेही फारच मस्त दिसत होते. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. अनेकांनी त्यांना ‘बेस्ट कपल’, ‘फार सुंदर’, ‘मस्त’, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : खास साडी परिधान करत अंकिता लोखंडेने साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, साडीची किंमत माहितीये का?

दरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी १४ डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यावर तिने स्पष्टीकरण देत “मी गरोदर नाही”, असं म्हटले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande and vicky jain get married again before their second anniversary cute kiss watch video nrp