अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. तिचे वडील शशिकांत लोखंडे यांना आज ओशिवरा येथे अखेरचा निरोप देण्यात आला. वडिलांच्या अंत्यसंस्कारवेळी अंकिता हमसून हमसून रडत होती. तिच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले होते. अंकिताचा पती विकी जैन तिला सांभाळताना दिसला.
अभिनेत्री अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन
अंकिता लोखंडेने वडील शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यानंतर तिच्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी रडणाऱ्या अंकिताला पती विकी जैन सावरताना दिसला.
वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी अंकिता विकीच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत होती.
अभिनेता कुशाल टंडन अंकिताच्या वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आला होता.
अभिनेत्री श्रद्धा आर्यादेखील अंकिताच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला आली होती.
दरम्यान, अंकिताच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण सध्या समजू शकलेले नाही, मात्र ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते असं बोललं जातंय. त्यांचं निधन १२ ऑगस्टला सायंकाळी झालं. अंकिताचे वडील व्यवसायाने बँकर होते.