अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा अंकिता तिचे फोटो शेअर करताना दिसते.
अंकिताने नुकतंच पती विकी जैनबरोबरचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. दोघांनी मिळून केक कापल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर विकीने अंकिताला किस करत मिठी मारल्याचं दिसत आहे. विकी जैनबरोबरचा अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा>> प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही बहिणी आहेत फौजी, वडिलही होते लष्कर अधिकारी; फोटो शेअर करत म्हणाली…
“पाच वर्षांपूर्वी या हँडसम व्यक्तीला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल देवा तुझे आभार. दुसऱ्यांप्रती आदर व प्रेमाची भावना तो व्यक्त करतो,” असं कॅप्शन अंकिताने व्हिडीओला दिलं आहे. अंकिताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी त्यांचं पाच वर्षांचं रिलेशनशिप सेलिब्रेट करताना दिसत आहेत.
अंकिताने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात अंकिता झळकली होती. डिसेंबर २०२१मध्ये अंकिताने व्यावसायिक विकी जैनसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.