हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे अंकिता चर्चेचा विषय असते. लवकरच अंकिता आत्या होणार आहे. नुकताच तिच्या वहिनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला अंकिताने खास डान्स केला होता. याचा व्हिडीओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी बाळाला भेटायला खूप आतुर आहे. माझ्या इतकं आतुरतेने बाळाची वाट पाहणारं दुसरं कोणी नाही,” असं कॅप्शन लिहित अंकिता लोखंडेने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘कान्हा सो जा जरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अंकिताच्या या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिताने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी खास मराठमोळा लूक केला होता. ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहे.

अंकिता लोखंडेच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप छान आत्या”, “मस्त”, “किती गोड”, “खूप सुंदर डान्स”, “तू कधी आनंदाची बातमी देणार?”, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया अंकिताच्या या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

दरम्यान, अंकिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘कलर्स टीव्ही’वरील ‘लाफ्टर शेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात तिच्याबरोबर पती विकी जैनदेखील आहे. गेल्या वर्षी अंकिता लोखंडे रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अंकिताच्या कामाचं खूप कौतुक झालं. माहितीनुसार, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील भूमिकेसाठी अंकिताने एकही रुपया मानधन घेतलं नव्हतं. या चित्रपटानंतर अंकिता अल्बम साँगमध्ये पाहायला मिळाली.