अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या जी ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक आहे. ती या शोमध्ये अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलत असते. सुशांतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. अंकिता मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्याशी गप्पा मारताना सुशांतच्या आठवणी सांगत असते. पण अंकिता सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळविण्यासाठी त्याच्या नावाचा वापर करते, असं तिच्या सासू रंजना जैन म्हणाल्या. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर अंकिताची आई वंदना लोखंडे यांनी तिला भूतकाळाबद्दल तिने का बोलू नये हे समजावून सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताज्या एपिसोडमध्ये वंदना त्यांची मुलगी अंकिता आणि जावई विकी यांना भेटल्या आणि त्यांना सांगितलं की त्यांची भांडणं घराबाहेर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे दोघांनीही एकमेकांसाठी जपून शब्द वापरावे. त्या दोघांशी बोलल्यानंतर त्या अंकितासोबत बागेत बसल्या होत्या. यावेळी त्यांनी वर्तमान काळातील आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आणि भूतकाळाबद्दल फार बोलू नये, असं सुशांतचं नाव न घेता समजावलं.

“ती रस्त्यावर नव्हती…”, खर्चाच्या विधानावरून अभिनेत्रीने अंकिता लोखंडेच्या सासूला सुनावलं; म्हणाली, “दोन दिवसात…”

त्या अंकिताला म्हणाल्या, “बऱ्याच गोष्टी बाहेर चांगल्या दिसत नाहीयेत. तुमचं लग्न टिकणार नाही, असं लोक म्हणत आहेत. हे तुम्हा दोघांनी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच, तू ज्या पद्धतीने वारंवार तुझ्या भूतकाळाबद्दल बोलत आहेस ते बाहेरच्या लोकांना बघायला चांगलं वाटत नाहीये.” अंकिता लोखंडेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की जेव्हा मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार त्याच्याबद्दल बोलले तेव्हाच ती सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलली. “तो (सुशांत) अभिषेकचा आदर्श आहे आणि तो मला त्याच्याबद्दल विचारत राहतो म्हणून मी त्याच्याबद्दल बोलते,” असं अंकिता म्हणाली.

अंकिता लोखंडे शोमध्ये वारंवार करते एक्स बॉयफ्रेंड सुशांतचा उल्लेख; तिच्या सासूबाई म्हणाल्या, “ती त्याचं नाव घेऊन…”

विकीच्या कुटुंबाला तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोललेलं आवडणार नाही, असं अंकिताची आई तिला सांगते. “पण तू त्याबद्दल काहीच बोलू नकोस”, असा सल्ला वंदना लोखंडे यांनी आपल्या मुलीला दिला. अंकिता पुढे म्हणाली, “पण मी सुशांतबद्दल विकीच्या समोरही बोलले आहे,” यावर तिची आई अडवत म्हणाली, “प्रत्येकजण विकीसारखा नसतो ना. त्याचे कुटुंबीय याबद्दल काय विचार करतील, करत आहेत हे तुला माहीत नाही.”

“दोघांच्या लग्नाला आमचा पाठिंबा नव्हता”, अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या, “त्यांच्यातील भांडणं…”

शेवटी अंकिताने होकार दिला आणि ती शोमध्ये सुशांतबद्दल बोलणार नाही, असं ती म्हणाली. सुशांत आणि अंकिता टीव्ही शो ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर भेटले होते आणि प्रेमात पडले. ते जवळपास ७ वर्षे एकत्र होते, त्यानंतर वेगळे झाले. त्यांच्या ब्रेकअपनंतर अंकिता विकी जैनला भेटली आणि त्यांनी २०२१ मध्ये एकमेकांशी लग्न केलं. तर सुशांतसिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande mother suggests her not to talk about sushant singh rajput on bigg boss 17 vicky jain family hrc