‘बिग बॉस’चं १७वं पर्व जरी संपलं असलं तरी त्यामधील सदस्यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. हे सदस्य वेगवेगळ्या पार्टीमध्ये दिसत आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांची सातत्याने चर्चा होतं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकी सतत भांडताना दिसले. त्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळी तिला समर्थन करत होते. यामध्ये बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिचा देखील समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना रणौतने सोशल मीडियाद्वारे अंकिताच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अंकिताने कंगनाबरोबर असलेलं नातं सांगितलं. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात असताना कंगनाने तिला कशाप्रकारे पाठिंबा दिल्या? याविषयी ती बोलली.

हेही वाचा – Bhool Bhulaiyaa 3 मध्ये मंजुलिका परत येणार, कार्तिक आर्यनने अभिनेत्रीचं नाव अन् प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

अंकिता लोखंडेने सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, “आम्ही इतक्या चांगल्या मैत्रिणी होऊ, याचा विचार मी आणि कंगनाने कधीच केला नव्हता. जेव्हा आम्ही ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या सेटवर भेटलो आणि कंगनाने मला दिग्दर्शित करायला सुरुवात केली तेव्हा आमचं नातं दृढ होतं गेलं. आमच्या दोघींची अशी कहाणी वगैरे काही नाही. ती मला बघून नेहमी असं म्हणते की, तू तर माझ्यासारखीच आहेस. एकदम वेडी. इथेच माझे आणि कंगनाचे स्वभाव जुळले.”

हेही वाचा – Video: “कलाकार जुने आहेत पण…”, शिवानी बावकर व आकाश नलावडेच्या नव्या मालिकेबद्दल नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

पुढे अंकिता म्हणाली, “जेव्हा मी ‘बिग बॉस’च्या घरात होती तेव्हा कंगना माझ्या आईच्या संपर्कात होती. ती आईशी सतत बोलायची. ‘बिग बॉस’च्या घरात असताना जे काही माझ्या आयुष्यात सुरू होतं त्यामुळे कंगनाला खूप काळजी लागली होती. मी ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच ती माझ्याशी तासभर बोलली. तिने मला पुढे कशाप्रकारे गोष्टी हाताळायच्या याविषयी सांगितलं. कंगनाबरोबर माझं बहिणीसारखं नातं आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande on her sister like bond with kangana ranaut she was very worried after seeing whatever was going in bigg boss 17 house pps