अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) व विकी जैन ही जोडी ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वानंतर अधिकच प्रसिद्धी झोतात आली. ‘बिग बॉस’च्या घरात सतत वाद घालणारी ही जोडी अनेकदा ट्रोल झाली. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर अंकिता विकी जैनशी घटस्फोट घेणार, असा देखील अंदाज अनेकांनी वर्तवला. पण तसं काही झालं नाही. अंकिता व विकी दोघंही आपलं वैवाहिक आयुष्य सुंदररित्या जगताना दिसत आहेत. अशातच लग्नाच्या तीन वर्षांनंतर अंकिता लोखंडे आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) व विकी जैन ‘कलर्स टीव्ही’च्या ‘लाफ्टर शेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या कार्यक्रमात अंकिता, विकी व्यतिरिक्त अली गोनी, निया शर्मा, राहुल वैद्य, जन्नत जुबैर, रीम शेख, कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाहा आहे. याच कार्यक्रमातील अंकिता व विकाचा मित्र अली गोनीच्या विधानामुळे अंकिता गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – Video: “पूछो जरा पूछो…”, आमिर खान-करिश्मा कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणेचा डान्स, एक्स्प्रेशनने वेधलं लक्ष

अली गोनी मस्तीमध्ये म्हणाला की, छोटी जैन किंवा छोटी जैनी येत आहे. याच विधानामुळे अंकिता ( Ankita Lokhande ) गर्भवती असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. त्यामुळे अंकिता लग्नाच्या तीन वर्षांनंतर आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण आता या अफवा आहे की खरंच आहे? हे आता येत्या काळात स्पष्ट होईल.

दरम्यान, याआधीही अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) आई होणार असल्याचा अफवा पसरल्या होत्या. तेव्हा अंकिता एका मुलाखतीमध्ये म्हणाली, “आम्ही नेहमी मुलांविषयी बोलत असतो. आमच्या नात्याचं भविष्य मुलं आहेत. माझ्याकडे लपवण्यासाठी काहीच नाहीये. पण कधी ना कधी तरी मुलं होतील. आम्हाला नाही माहित आमची मुलं कधी होती? परंतु आम्ही या विषयावर चर्चा नेहमी करत असतो. जेव्हा मी मुलांविषयी चर्चा करते तेव्हा मला खूप चांगलं वाटतं.”

हेही वाचा – अभिज्ञा भावेने नेसली आजीची साडी, फोटो शेअर करत लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली, “वर्षभरानंतरही…”

एकही रुपया मानधन न घेता अंकिताने चित्रपटात केलं होतं काम

अंकिता लोखंडेच्या ( Ankita Lokhande ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी ती रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अंकिताच्या कामाचं खूप कौतुक झालं. माहितीनुसार, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील भूमिकेसाठी अंकिताने एकही रुपया मानधन घेतलं नव्हतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande pregnant after 3 years marriage aly goni is revealed pps