अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २००९ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. अंकिताने २०२१ मध्ये व्यावसायिक विकी जैनबरोबर लग्न केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. या गरोदरपणाच्या अफवांवर अंकिता लोखंडेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
हेही वाचा : २५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडे विजयी, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप
अंकिता लोखंडे ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसतं, तेव्हा लग्न केव्हा करणार? असा प्रश्न विचारला जातो. पुढे लग्न झाल्यावर मुलं केव्हा होणार? असे प्रश्न विचारले जातात. या अशा गोष्टींचा सामना अलीकडे सगळ्याच अभिनेत्रींना करावा लागतो. माझं लग्न झाल्यावर अनेक लोक घटस्फोटाबाबत सुद्धा चर्चा करत होते. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही आणि मला फरकही पडत नाही.”
हेही वाचा : ‘जवान’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट, पण गाठला १०० कोटींचा टप्पा; चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती? वाचा
अंकिता पुढे म्हणाली, “अनेक युट्यूब चॅनेल्सवर मी माझे मॉर्फ केलेले फोटो पाहिले आहेत. माझ्या फोटोंवर फोटोशॉप करून माझ्या पोटावर बेबी बंप तयार केलेला दिसतो…हे फोटो पाहून मला खरंच हसायला येतं. या लोकांना काही कामं नाहीत का? असे फोटो फक्त टाईमपास म्हणून बनवले जातात.”
“सध्या गर्भधारणेची आमची योजना नाही. योग्यवेळी सगळ्या गोष्टी होतील. मी आयुष्यात कोणत्याच गोष्टी ठरवून करत नाही. करिअर असो लग्न किंवा बाळ देवाच्या मनात गोष्टी असतात तेव्हा घडतात. मला आता कशाचीही चिंता नाही. योग्यवेळी गोष्टी होतील फक्त देवाची इच्छा असली पाहिजे.” असं अंकिताने सांगितलं. दरम्यान, अंकिता लोखंडे तिचा नवरा विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.