अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २००९ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता घराघरांत लोकप्रिय झाली आणि प्रसिद्धीझोतात आली. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका जवळपास ५ वर्ष सुरु होती. मालिकेला नुकतीच १४ वर्ष पूर्ण झाल्याने अंकिताने खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ‘पवित्र रिश्ता’मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अंकितासह महत्त्वाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा : “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’

अंकिताने नुकत्याच टीव्ही टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेटवरील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात ‘पवित्र रिश्ता’साठी जेवढी मेहनत केली तेवढी कधीच केली नव्हती. जवळपास ३ महिने मी माझ्या घरी गेले नव्हते. आमचं शूटिंग दिवस-रात्र चालायचं आणि हे सगळं अगदी खरं आहे. सेटवर मी पुरुषांच्या बाथरूममध्ये अंघोळ करायचे. त्यांनी माझ्यासाठी ते बाथरूम रिकामी ठेवलं होतं.”

हेही वाचा : अभिनेत्री तेजश्री प्रधानला आवडतं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हे’ पात्र, म्हणाली….

अंकिता पुढे म्हणाली, “माझे केशभूषाकार माझ्या कपड्यांना इस्त्री करायचे अनेकदा माझ्याकडे नवीन अंतर्वस्त्र नसायचे. त्यामुळे आम्ही आमच्याकडचे कपडे धुवायचो आणि इस्त्री करायचो. या सगळ्या गोष्टींमुळे मला आयुष्यात खूप फायदा झाला. ३० तास नव्हे तर पवित्र रिश्ताच्या सेटवर मी सलग १४८ तास काम केले आहे. हा माझा रेकॉर्ड आहे.”

हेही वाचा : “पुन्हा एकदा तोच प्रवास…”, गश्मीर महाजनी ऐतिहासिक भूमिकेत झळकणार; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

“मी तेव्हा खूप मेहनत केली त्यामुळे आज माझ्याकडे लोकांना सांगण्यासाठी एक कथा आहे. माझी आई कायम माझ्याबरोबर असायची. तुम्ही सेटवर झोपू शकता, उठू शकता अशी सोय होती परंतु, सतत माझे सीन्स असल्यामुळे त्यांनी मला घरी जाऊ दिलं नाही. मालिका नेहमीच स्त्रियांमुळेच चालतात आणि माझं काम प्रत्येक सीनमध्ये होतं.” असं अंकिताने सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीने या मालिकेत ‘अर्चना’ हे पात्र साकारले होते.

Story img Loader