टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून अंकिता घराघरांत पोहचली. बिग बॉस १७ च्या पर्वात अंकिता तिचा पती विकी जैनबरोबर सहभागी झाली होती. बिग बॉसमुळे विकी प्रसिद्धीझोतात आला. बिग बॉसच्या घरात अंकिता व विकीमध्ये सतत वाद होताना बघायला मिळाले होते. हे वाद इतके टोकाला गेले होते की, दोघांनी अनेकदा वेगळे होण्याबाबतही वक्तव्य केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत अंकिता व विकीने त्यांच्या लग्नाबाबत अनेक खुलासे केले आहेत.
अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या शोमध्ये अंकिता व विकी सहभाग झाले होते. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल व लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एवढचं नाही तर सुरुवातीला विकीला माझ्याशी लग्न करायचे नव्हते, असा खुलासाही अंकिताने केला आहे. अंकिता म्हणाली, “विकीने मला सांगितले होती की तो माझ्याशी लग्न करू शकत नाही. कारण आमच्या दोघांची जीवनशैली खूप वेगळी होती. त्यामुळे त्याला माझ्याबरोबर लग्न करायचे नव्हते. विकी बिलासपूरला राहतो, त्यामुळे त्याला बिलासपूरमध्ये राहणाऱ्या मुलीशी लग्न करायचे होते.”
विकीनेही अंकिताबरोबरच्या नात्याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, “अंकिताने मला कधीच बोलण्याची संधी दिली नाही, त्यामुळे मी माझ्या भावना व्यक्त करू शकलो नाही. मला असे वाटते की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. त्यावेळी अंकिता अशा स्थितीत होती जिथे तिला लग्न करण्याची इच्छा होती. “
अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता एकटी पडली होती. विकी व अंकिता अगोदरपासून मित्र-मैत्रीण होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिता व विकीमधील बोलणे वाढले. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १४ डिसेंबर २०२१ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. अंकिता व विकीच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.