लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसत आहे. ३९ वर्षीय अभिनेत्रीने तिचा पती विकी जैनसह शोमध्ये सहभाग घेतला आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडेला चाहते खूप पसंत करत आहेत. या शोमुळे अंकिता पुन्हा चर्चेत आली आहे. नुकतंच या शोमध्ये अंकिताने सुशांत सिंग राजपुतची आठवण काढली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता बऱ्याचदा त्याच्याविषयी बोलते, तिच्या आठवणी आपल्याबरोबर शेअर करते.

‘बिग बॉस १७’च्या नव्या एपिसोडमध्ये अंकिताने सुशांतबरोबरच अशीच एक आठवण शेअर केली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘पीके’ चित्रपटात जेव्हा सुशांतचे इंटीमेट किसिंग सीन अंकिताने पाहिले तेव्हा नेमकी तिची काय प्रतिक्रिया होती याबद्दल तिने खुलासा केला आहे. बिग बॉसमधील स्पर्धक अभिषेक कुमारशी नातेसंबंधाबद्दल भाष्य करताना अंकिताने तिची सुशांतबरोबरची आठवन शेअर केली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा आपले इंटीमेट सीन्स अंकिताने एकट्यात पहावे असे सुशांतला वाटत असल्याने त्याने अंकितासाठी खास पूर्ण थिएटर बुक केले होते.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…

आणखी वाचा : १०० कोटी क्लबचा पहिला हिंदी चित्रपट ‘गजनी’ला १५ वर्षे पूर्ण; प्रेक्षक हा चित्रपट १५ मिनिटांत विसरले असते तर…

अंकिता म्हणाली, “त्याने संपूर्ण थिएटर बुक केले होते कारण त्याला माहीत होतं की मी त्याचे इंटीमेट सीन्स पाहून प्रचंड अस्वस्थ होऊ शकते. जेव्हा ते सीन्स माझ्यासमोर आले तेव्हा माझी हाताची नखं अक्षरशः सीटच्या हॅंडलवर रुटली होती, इतका मला राग आला होता. चित्रपट पूर्ण झाल्यावर जेव्हा मी परत आले तेव्हा मी खूप रडले.” नंतर जेव्हा सुशांत आणि अंकिता जवळ यायचा प्रयत्न करायचे तेव्हा अंकिताच्या डोळ्यासमोर चित्रपटातील त्याचे इंटीमेट सीन्स उभे राहायचे. याविषयी बोलताना ती म्हणाली, “माझ्या डोक्यात सतत त्याच सीन्सचा विचार यायचा अन् मग मी सुशांतला माझ्यापासून दूर ढकलायचे. तुमचा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीला किस करताना पाहणंच फार विचित्र आहे.”

बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या इतर स्पर्धकांनी तिला विचारलं की सुशांतने यासाठी तिची परवानगी घेतली होती का? यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली, “मी कोणाच्याच करिअरच्या आड आले नाही, पण आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीबरोबर किस करताना पाहणंच पचनी पडणारं नाही. ‘पीके’मधील सीन पाहतानासुद्धा मला चक्कर आली होती.” सुशांतबरोबर ब्रेक अप झाल्याची गोष्टसुद्धा अंकिताने दोन वर्षं सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. कदाचित तो तिच्या आयुष्यात परत येईल या आशेवर अंकिता बरीच वर्षं होती.

Story img Loader