छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. बिग बॉस १७ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. या शोमध्ये अनेकदा ती तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसते. दरम्यान, नुकतंच अंकिताने सुशांतबरोबर झालेल्या ब्रेकअपबाबतचं मौन सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- Video: विकी जैनच्या ‘त्या’ विधानावर भडकली ऐश्वर्या; अंकिता लोखंडेबरोबरच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करत म्हणाली, “तूच पीडित…”

मुन्नवर फारुखीबरोबर बोलताना अंकिताने सुशांतबरोबर झालेल्या ब्रेकअपमागचं कारण सांगितलं. अंकिता म्हणाली, “तो एका रात्रीत बदलला. एकीकडे त्याला यश मिळत होतं; तर दुसरीकडे लोक त्याचे कान भरत होते. मला सुशांतच्या डोळ्यांत ते प्रेम दिसतच नव्हतं.”

काही दिवसांपूर्वीच अंकितानं सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर काय अवस्था झाली होती याबाबत खुलासा केला होता. अकिंता म्हणालेली, “सुशांतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी मला अडीच वर्षं लागली. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. सुशांत मााझ्याकडे परत येईल, या आशेनं मी त्याची वाट बघत होते; पण तो पुढे निघून गेला. मीही ‘मूव्ह ऑन’ करण्याचा प्रयत्न केला; पण माझ्याकडून जमलं नाही. त्यावेळी दुसऱ्याला डेट करण्याची कल्पनाही मी करू शकत नव्हते.”

हेही वाचा-“आक्रोश, यातना आणि मग आत्महत्या…” मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “या लढ्यात…”

अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये एकत्र दिसले होते. दोघे सात वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. पण २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्याची बातमी आली. सुशांतच्या आत्महत्येमुळे अंकिताला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या धक्क्यातून सावरल्यानंतर अंकितानं २०२१ मध्ये तिचा जवळचा मित्र विक्की जैन याच्याबरोबर लग्नगाठ बांधली.