‘बिग बॉस १७’ दिवसेंदिवस रंजक होत चालले आहे. यंदाचं पर्व खासकरून पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. अंकिता व विकीच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. आतापर्यंत गोडीगुलाबीने एकत्र राहून चाहत्यांची मनं जिंकणारं हे जोडपं बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहे. दोघांची आतापर्यंत अनेकदा कडाक्याची भांडणं झाली आहेत. पण आता ताज्या भागात अंकिताने पतीला चप्पल फेकून मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस १७’ च्या या एपिसोडमध्ये, अंकिता लोखंडे रागाच्या भरात पतीवर संतापल्याचं पाहायला मिळालं. कारण तिने पती विकी जैनला घरातील इतर लोकांसमोर खोटं बोलताना पकडलं. झालं काय तर मुनव्वर फारुकी ‘दिमाग का घर’मध्ये राहणाऱ्या विकीने त्याचे जेवण ईशा मालवीय आणि इतरांसोबत शेअर केले की नाही असं विचारतो. यावर ‘दिल का घर’मध्ये राहणारी ईशा मुनव्वरला म्हणाली की ‘दम का घर’मधील खानजादीने ‘दिमाग का घर’मधील सदस्यांनी बनवलेले अन्न खाल्ले होते. मात्र, विकी आणि खानजादी ईशाचा दावा फेटाळतात. याचदरम्यान अंकिता लोखंडे तिथे पोहोचते.

विवाहित असून प्रेमात पडले, काहींनी पहिल्या पत्नीला सोडून लग्नंही केली पण अखेर त्यांच्याकडेच परतले ‘हे’ सेलिब्रिटी

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

अंकिताला पूर्ण प्रकरण कळाल्यानंतर तिने खुलासा केला की तिने खानजादीला दिमाग का घरमधील सदस्यांचे जेवण खाताना पाहिलं होतं. यानंतर विकी मस्करी करत अंकिताची मान मागून पकडून तिला ओढतो. अंकिताने विकीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता विकीने तिला मागून पकडून तिचा हात धरला. या मस्करीदरम्यान अंकिता विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली, पण तो न थांबल्याने अंकिताने तिची चप्पल काढली आणि गमतीत विकीला मारली.

“मी सुशांतच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते”, अंकिता लोखंडेचा खुलासा; म्हणाली, “विकी म्हणाला होता की…”

दरम्यान, या एपिसोडमध्ये विकी जैनने सनाचा हात पडकल्याचं पाहायला मिळालं. यामुळे विकीला प्रेक्षकांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande throw slippers on husband vicky jain in bigg boss 17 hrc