‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आहे. अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतोय. ‘विरल भयानी’ या पापाराझी अकाउंटवरून अंकिताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता नुकतीच एका मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. त्यावेळेचा हा व्हिडीओ आहे. आता देवाचं दर्शन घेण्यासाठी कोण ट्रोल करतं का? तर नाही. या देवदर्शनासाठी अंकिताने टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातली होती आणि अभिनेत्रीने देवळात जाण्यासाठी तोकडे कपडे घातले यावरून ती ट्रोल झाली.

हेही वाचा… इम्रान खान आणि लेखा वॉशिंग्टनच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम; अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला रोमँटिक फोटो

अंकिताच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती सफेद टी-शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट्समध्ये दिसतेय. तेव्हा अंकिता नुकतीच एका देवळात जाऊन बाहेर आली होती. तेवढ्यात पापाराझींनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. यावर अंकिता त्यांना म्हणाली, “अरे जाऊदे मला, मी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आले होते.” यावर एक पापाराझी तिला म्हणाला, “वाह, दर्शन घ्यायला आलात ही तर चांगली गोष्ट आहे.”

अंकिता तेवढ्यात तिच्या कारमध्ये बसली आणि तिच्या हाताला लागलेलं पाहून एका पापाराझीने तिला विचारलं, “हाताला काय झालंय.” त्यावर अंकिता “फ्रॅक्चर झालंय” असं म्हणाली आणि कारमध्ये बसून निघून गेली. या सगळ्यात नेटकऱ्यांचं लक्ष तिच्या कपड्यांनी वेधून घेतलं. अंकिताने मंदिरात जाण्यासाठी शॉर्ट्स घातल्याचं पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. अंकिताचा हा व्हिडीओ व्हायरल होताच एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “शॉर्ट्स घालून मंदिरात कोण जातं?”, तर दुसऱ्याने लिहिलं, “मंदिरात असे कपडे घालून आलीय, वाह ताई.”

एका युजरने कमेंट केली, “पागल… मंदिरात बघा कसे कपडे घालून आली आहे. “

अंकिताने मंदिरात शॉर्ट्स घालून गेल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या अशा वागण्यामुळे नेटकरी संतप्त झाले आहेत आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय.

हेही वाचा… राखी सावंतच्या आजारपणावर आदिल खानचा संशय; म्हणाला, “कोर्टाची तारीख जवळ येतेय म्हणून…”

दरम्यान, अंकिता शेवटची ‘बिग बॉस १७’मध्ये झळकली होती. या शोमध्ये अंकिता टॉप -५ पर्यंत पोहोचली, पण विजेत्याचा किताब मिळवू शकली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande trolled due to wearing shorts in mandir video viral dvr