अंकिता लोखंडे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अंकिता आता पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी झाली आहे. विकी व अंकिताने धमाकेदार डान्स करत घरात एंट्री केली. घरात जाण्यापूर्वी सलमानने या दोघांचा सात वचन घ्यायला लावले.

‘बिग बॉस १७’ ची दणक्यात सुरुवात, सलमान खानच्या शोमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैनसह ‘हे’ १७ स्पर्धक सहभागी

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”

अंकिता आणि विकीची शोमध्ये एंट्री झाल्यानंतर सलमान खानने त्यांचे स्वागत केले. यानंतर तो म्हणतो, ‘आम्ही तिला शोमध्ये येण्यासाठी अनेकदा संपर्क केला आणि शेवटी ती शोमध्ये आली.’ यावर अंकिताने मजेदार प्रतिक्रिया दिली. तसेच ती ‘बिग बॉस १७’ मध्ये कशी आली याचाही तिने खुलासा केला. ‘विकीने मला विकले अन् मी विकले गेले…’ असं ती म्हणाली. यावर सलमान म्हणाला, ‘ठीक आहे, म्हणजे विकीला यायचं होतं म्हणून तू त्याच्यासाठी आली आहेस.’

Bigg Boss 17 च्या मंचावर सलमान खानसमोरच एक्स जोडप्याचं कडाक्याचं भांडण, आरोप ऐकून अभिनेता म्हणाला…

याबरोबरच ग्रँड प्रीमियरमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी एकमेकांबद्दलच्या वाईट-चांगल्या गोष्टी सांगितल्या. दरम्यान, दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. विकीची एक सवय अंकिताला अजिबात आवडत नाही की तो नव्या लोकांमध्येही पटकन मिसळतो.

‘बिग बॉस’च्या घरात येण्यापूर्वी सलमान खानने अंकिता आणि विकीला सात वचनं दिली. यामध्ये अंकिताच्या चुकांची बोलणी विकीला खावी लागणार, अंकिता थकली की विकी तिचे पाय दाबणार अशा मजेशीर वचनांचा समावेश होता. दरम्यान, हा शो प्रेक्षकांना कलर्स टीव्ही व जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.

Story img Loader