लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Actress Ankita Lokhande) घरी नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. अंकिता व तिचा पती विकी जैन यांनी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर नवीन पाहुण्याच्या आगमनाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, त्यांची ही पोस्ट पाहिल्यावर काहींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे, तर काहींनी ट्रोल केलं आहे.

अंकिता लोखंडे व विकी जैन या दोघांच्या लग्नाला लवकरच तीन वर्षे होतील. आता त्यांनी त्यांच्या घरात नवीन सदस्याचं स्वागत केलं आहे. पोस्ट पाहता अनेकांना वाटलं की अंकिता आई झाली आहे, पण तसं नाही. अंकिता व विकी यांनी एक मांजर घरी आणली आहे. या मांजरीचे पालक झाल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी या मांजरीचं नावही ठेवलं आहे.

Bigg Boss Marathi 5: निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”

व्हिडीओत अंकिता मांजरीला घरात आणताना दिसते, तर विकी जैन त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असतो. नंतर दोघेही या मांजरीबरोबर खेळताना व वेळ घालवताना दिसतात. आमची छोटी राजकुमारी माऊ लोखंडे जैनचे कुटुंबात स्वागत! तू आमच्या कुटुंबात नवीन सदस्य आहे. आई आणि बाबा आधीच तुझ्या प्रेमात आहेत! तुझे छोटे पंजे आमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येवोत. आमचं अभिनंदन करा! माऊ, तुझ्यामुळे आमचे जीवन हास्याने आणि आनंदाने भरले राहो. माऊ, आमची गोड मुलगी! असं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलं आहे.

…अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”

अंकिताच्या या व्हिडीओवर काहींनी कमेंट करत तिने आणलेली मांजर खूपच गोंडस असल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी लोक मांजरीला मुलं समजतात असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर काही सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अंकिता व विकी सध्या ‘लाफ्टर शेफ अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या शोमध्ये दिसत आहेत.