१६ पर्व यशस्वी झाल्यानंतर बिग बॉसचं ‘बिग बॉस’ १७वं पर्व १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपल्यापासून प्रेक्षकांचं बिग बॉसच्या १७व्या पर्वाकडे लक्ष लागून राहिलं होतं. या आगामी पर्वात अंकिता लोखंडे ही सहभागी होणार आहे आणि आता तिच्याबद्दल मोठी चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा नवरा विकी जैनबरोबर या पर्वात सहभागी होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. तर या पर्वासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे. या परवासाठी त्यांनी तब्बल २०० आऊटफिट तयार करून घेतले आहेत. आता या पर्वात अंकिता लोखंडे घेणार असलेल्या मानधनाबद्दल चांगल्या चर्चा रंगल्या आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसमधील आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक असणार आहे असं बोललं जात आहे. अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे या पर्वत प्रत्येक आठवड्यासाठी ती १० ते १२ लाख रुपये मानधन घेणार आहे. हा आकडा १२ लाखांपेक्षा जास्तही असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. अजून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘बिग बॉस १६’मध्ये सुंबुल तौकीर ही सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली होती. तर आता अंकिता तिचाही रेकॉर्ड मोडणार असल्याचं बोललं जात आहे.